इलेक्ट्रिक कुकर कसा वापरावा?
![]() |
| जाहिरात |
-दरवेळी वापराचे पूर्वी व नंतर मशिन सोबत दिलेला नॉन स्टिक कंटेनर कोमट पाणी व लिक्विड सोपने स्वच्छ धुवून व कॉटन कपड्याने पुसून घ्यावा. क्लिनिंगसाठी सॉफ्ट स्क्रबर वापरावा .
-नॉन स्टिक कंटेनर व्यतिरिक्त अन्य पार्टस कोरड्या कापडाने पुसून घ्यावे. ( कॅबिनेट, लीड इत्यादी)
-कोणत्याही परिस्थितीत कॉईलचा पाण्याशी संपर्क होवू देऊ नये.
-तांदूळ दुसऱ्या वेगळ्या भांड्यात दोन वेळा धुवून नंतर मशिन सोबत दिलेल्या नॉन स्टिक कंटेनर मध्ये घालून त्यामध्ये दिडपट किंवा दुप्पट वा गरजे अनुसार पाणी घालावे .
-कंटेनरची एकूण क्षमता लक्षात घेऊन तांदूळ अधिक पाणी याचे एकूण अधिकतम प्रमाण जाणून घ्यावे व त्या अनुसार वापर करावा.
-तांदूळ नॉन स्टिक कंटेनरमध्ये पाण्यामध्ये व्यवस्थित पसरवलेले हवेत व सदर कंटेनर कॉईलवर व्यवस्थित ठेवावा व लीड लावून घ्यावे.
- मशिनला सप्लाय देण्यासाठी अर्थिंग सह पॉवर पॉईंट आवश्यक आहे.
-मेन्स कॉर्ड लावून स्विच ऑन करावे, कुक प्रोसेस स्विच प्रेस करावे .
-कुकिंग सुरू असताना अधेमधे इलेक्ट्रिक कुकरचे लीड उघडून बघू नये.
-स्विच चालू असताना शक्यतो मशिनला स्पर्श करणे टाळावे.
-काही मिनिटे (अंदाजे 20-25) झाल्यावर भात तयार होतो ,कुक प्रोसेस स्विच आपोआप बंद होते (अॅटोमॅटिक मॉडेल असेल तर) , त्यानंतर मेन्स स्विच बंद करावे व मेन्स कॉर्ड काढावी .
-काही मिनिटे थांबून नंतरच नॉन स्टिक कंटेनर बाहेर काढावा.
-सर्व्हिंग साठी वूडन किंवा प्लास्टिक स्पून वापरावे ,मेटल स्पून वापरू नये.
-मशिन सोबत दिलेला नॉन स्टिक कंटेनर इतर उपकरणां सोबत (जसे की शेगडी वा इंडक्शन) वापरू नये. तसेच मशिन सोबत दिलेल्या नॉन स्टिक कंटेनर शिवाय इतर काही (अन्य भांडी) या मशिन सोबत वापरू नये.
-मशिनचा सलग दिर्घकाळ वापर टाळावा.
दिलेल्या माहितीत मशिनच्या कंपनी व मॉडेल अनुसार बदल आवश्यक असू शकतो.
गॅरंटी/वॉरंटी कार्ड व इन्स्ट्रक्शन मॅन्युअल काळजीपूर्वक वाचा.
नियम व अटी लागू*

Comments
Post a Comment