वॉटर फिल्टर कसा वापरावा
![]() |
| जाहिरात |
(मिनरल वॉटर पॉट, टेबल टॉप, नॉन इलेक्ट्रिक टाईप, सिरॅमिक डोम व मिनरल कार्ट्रिज असणारा )
-वॉटर फिल्टर ज्या बॉक्स पॅकिंमध्ये येतो त्यावरील चित्रा अनुसार सर्व पार्ट्स जोडून घ्यावेत.
-खालपासून वर पर्यंत टप्याटप्याने जोडणी साधारणतः पुढीलप्रमाणे : बेस .. लोअर पॉट विथ टॅप .. मिडल लिंक विथ मिनरल कार्ट्रिज .. अप्पर पॉट विथ सिरॅमिक डोम.. लीड इत्यादी
-सिरॅमिक डोम अप्पर पॉटमध्ये फिट केल्यानंतर वायसर पॉटच्या बाहेरील साईडला बसवून त्यावर प्लास्टिक कॅप बसवावी.
-मिनरल कार्ट्रिज मिडल लिंकला फिरकी प्रमाणे बसवावे.
-टॅपला आधी एक वायसर बसवून तो लोवर पॉटमध्ये फिट केल्यानंतर दुसरा वायसर पॉटच्या आतील साईडला बसवून त्यावर प्लॅस्टिककॅप बसवावी .
-कॅन्डलचा पहिल्यांदाच वापर करत असल्यास एक दोन वेळा पाणी फिल्टर करून काढून टाकावे .
-सिरॅमिक डोम दर 3-4 दिवसानंतर साध्या सॉफ्ट नायलॉन स्क्रबरने हळुवारपणे घासून स्वच्छ करावा .साबण / गरम पाणी वापरू नये .
-मिनरल कार्ट्रिज दर 15 दिवसानंतर साध्या पाण्यामध्ये खळबळवून स्वच्छ करावे. साबण /गरम पाणी वापरू नये .
-दर महिन्यातून किमान एकदा तरी संपूर्ण वॉटर फिल्टर सुट्टे भाग करून अप्पर व लोअर पॉट व इतर गोष्टी स्वच्छ कराव्यात .
-कंटेनर म्हणजेच पॉट साबणाचा (भांड्याचा) वापर करून स्वच्छ करावे.
-अप्पर पॉटमधील पाणी डोम व कार्ट्रिज द्वारे लोअर पॉटमध्ये येण्यासाठी 4 ते 8 तास लागू शकतात .
-दर सहा ते बारा महिन्यांनी सिरॅमिक डोम तसेच दर बारा ते चौवीस महिन्यानी मिनरल कार्ट्रिज बदलणे आवश्यक आहे. उपलब्ध पाण्याच्या दर्जा अनुसार व वापराच्या पद्धती अनुसार हा कालावधी कमी जास्त होऊ शकतो.
-सदर वॉटर फिल्टर हा फक्त लो टीडीएस पाण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
दिलेल्या माहितीत मशिनच्या कंपनी व मॉडेल अनुसार बदल आवश्यक असू शकतात.
इन्स्ट्रक्शन मॅन्युअल काळजीपूर्वक वाचा.
नियम व अटी लागू*

Comments
Post a Comment