गॅस शेगडी कशी वापरावी ?
(मॅन्युअल इग्निशन गॅस शेगडी)
![]() |
| जाहिरात |
-इन्स्टॉलेशनचे पूर्वी उपलब्ध करायच्या गोष्टी :-
_गॅस सिलेंडर कनेक्शन रेग्युलेटर सह
-इन्स्टॉलेशन वेळी उपलब्ध करायच्या गोष्टी :-
_गॅस पाईप
_गॅस लायटर
-गॅस सप्लाय घ्यायची काळजी :
_एक्सपायरी डेट न झालेला सिलेंडर (टाकी वर उल्लेख असतो)
_गॅस सिलेंडर एक्झिट नोझल मधील वायसरची तपासणी
_गॅस रेग्युलेटरची अधिकृत कंपनीकडून उपलब्धता
_गॅस पाईपची 5 फुटापर्यंत मर्यादा (यापेक्षा जास्त असल्यास कॉपर पाईप वापरू शकता)
_गॅस शेगडीसाठी सुटसुटीत जागा
_गॅस शेगडीची गॅस सिलेंडर पेक्षा अधिक उंचीवर जोडणी
-गॅस शेगडी साठी विशेष काळजी
_गॅस शेगडीची जागा वारंवार बदलू नये . गॅस पाईप जोडलेली असता गॅस शेगडीची जागा बदलल्यास नोझल खराब होऊ शकतो.
_गॅस शेगडीची बटणे /नॉब हळुवारपणे अलगद हाताळावीत .गॅस चालू करताना नॉब किंचित आत ढकळणे आवश्यक असते .व गॅस बंद करताना जराही बाहेर ओढायची गरज नाही .
_गॅस शेगडी ग्लास टॉप असल्यास असा सरफेस गरम असताना गार पाण्याशी संपर्क होऊ देऊ नये ,वापर झाल्यानंतर कोरड्या कापडाने व काही वेळाने ( तासभर ) ओल्या कापडाने पुसयला हरकत नाही .
_गॅस शेगडीचे बर्नर कॅप महिन्यातून एकदा गरम पाणी व लिक्वीडने धुवावेत व कोरड्या कापडाने पुसून पुन्हा वापरावे . कोणत्याही परिस्थितीत बर्नर कॅप गरम असताना गार पाण्याशी संपर्क होऊ देऊ नये .
_ग्लास टॉप सरफेस व ब्रास कॅप यांचं तापमानात अचानक बदल झाल्यास त्यामध्ये तडा जाणे / आकार बदलणे असे दुष्परिणाम संभवतात म्हणून गरम असताना गार पाण्याशी संपर्क होऊ देऊ नये.
_गॅस शेगडीच्या बटण/नॉब व निपल,गॅस कॉक मध्ये पाणी किंवा अन्य पदार्थ जाणार नाही याची दक्षता घ्यावी, यामध्ये पाणी किंवा अन्य पदार्थ गेल्यास ग्रीस व पाणी वा अन्य पदार्थ एकत्रित होऊन तयार होणारा लगदा, चिकटा यामुळे गॅस शेगडी मध्ये बिघाड संभवतो.
_गॅस शेगडी पाणी ओतून धुवायची नसते, त्या ऐवजीओल्या कापडाने पुसून काढू शकता .
_गॅस शेगडीच्या आसपास (विशेषतः गॅस कॉक,निपल इत्यादी ठिकाणी) मुंग्या, झुरळ, पाल किंवा तत्सम किटक / प्राणी जाऊन बिघाड होऊ शकतो. यासंदर्भात उपाय योजना करावी.
_गॅस शेगडी वर उलटे भांडे ठेवून बर्नरला हवा मिळणार नाही अशी कोणतीही स्थिती निर्माण करु नये. हे अपघाताला आमंत्रण ठरु शकते.
_इलेक्ट्रिक वायरिंग व बल्ब वगैरे युनिट पासून थोडे लांब असावे.
_गॅस लिकेजचा किंवा भडक्याचा वगैरे संशय असल्यास रेग्युलेटर तत्काळ बंद करावा व तज्ञ तांत्रिकाकडून तपासणी वा दुरुस्ती करून घ्यावी
दिलेल्या माहितीत मशिनच्या कंपनी व मॉडेल नुसार बदल आवश्यक असू शकतात.
गॅरंटी वॉरंटी कार्ड व इन्स्ट्रक्शन मॅन्युअल काळजीपूर्वक वाचा.
नियम व अटी लागू*

Comments
Post a Comment