वॉटर प्युरिफायर कसा वापरावा?
![]() |
| जाहिरात |
-वॉटर प्युरिफायरचे अनेक प्रकार उपलब्धत आहेत
A=RO+UV
B=RO+UF
C=RO+UV+UF
D=only UV
E=only UF
F=UV+UF
-वॉटर प्युरिफायरची निवड -
ओव्हरहेड टॅंकमधील पाण्याचा T.D.S तपासून घेणे.
बोअरवेलच्या हाय T.D.S पाण्यासाठी A, B,C यापैकी एक
तर
विहिर /नदीच्या लो T.D.S पाण्यासाठी D,E,F यापैकी एक
प्रकार निवडणे योग्य ठरते.
साधारणतः T.D.S. 200ppm पेक्षा कमी प्रमाण असेल तर लो मानला जातो व 200ppm पेक्षा जास्त प्रमाण असेल तर हाय मानला जातो.
या तपासणी अनुसार योग्य मॉडेल निवडावे.
वॉटर प्युरिफायरच्या विविध कॅन्डल्स व त्यांची पाण्या संदर्भातील कार्ये -
_प्री फिल्टर - दृश्य घटक व गढूळपणा दूर करणे (अंदाजे कार्यकाल 06 महिने)
_सेडिमेंट फिल्टर - सूक्ष्म दृश्य घटक दूर करणे(अंदाजे कार्यकाल 12 महिने)
_कार्बन फिल्टर - क्लोरीन कमी करणे व चव, वास सुधारणे (अंदाजे कार्यकाल 12 महिने)
_आर ओ मेंब्रेन - अतिरिक्त अनावश्यक जडत्व दूर करणे
(अंदाजे कार्यकाल 12 ते 24 महिने )
_यु व्ही ट्युब / यू फ मेंब्रेन -
बॅक्टेरिया दूर करणे (अंदाजे कार्यकाल 12 ते 24 महिने )
_मिनरल कार्ट्रिज -
नैसर्गिक चव कायम राखणे
(अंदाजे कार्यकाल 12 ते 24 महिने)
_या शिवाय अल्कलाईन, कॉपर व अन्य फिल्टर आवश्यकतेनुसार कमी जास्त असू शकतात.
(प्रत्येक स्टेजच्या अंदाजे
कार्यकालात इनपुट वॉटरच्या क्वालिटीनुसार फरक पडू शकतो , अंदाजे कार्यकाल 12 महिने असेल तर टप्प्याटप्प्याने12 महिन्यात 3000 लिटर पाणी असे सामान्यतः गृहीत धरतात)
-वॉटर प्युरिफायर इन्स्टॉल होण्यापूर्वी ओव्हर हेड टॅंकची साफ सफाई करून घ्यावी
-वॉटर प्युरिफायर इन्स्टॉल (नक्कीच इनस्टॉलेशन योग्य तांत्रिक व्यक्ती कडून करून घ्यावे) केल्या नंतर प्री फिल्टर (असल्यास) त्यातील स्पंज दर आठ ते पंधरा दिवसांनी स्वच्छ करावा. काही वॉटर प्युरिफायर मध्ये मॅन्युअल फ्लश सिस्टिम असल्यास दर आठ ते पंधरा दिवसांनी किमान दहा मिनिटे फ्लश करावे.
-स्टोरेज टॅंक मधील पाण्याच्या पातळी नुसार वॉटर प्युरिफायर जरी आपोआप चालू बंद होत असला तरीही होल्टेज फ्लक्च्युएशन मुळे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्सना होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी (सदर अडचण नॉन इलेक्ट्रिक मॉडेल साठी येतच नाही ) वॉटर प्युरिफायर शक्यतो मॅन्युअली चालू बंद करावा.म्हणजेच शक्यतो सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत एक - दोनदा कधीही इलेक्ट्रिक स्विच चालू करून स्टोरेज टॅंक भरून घ्यावा व इतर वेळी इलेक्ट्रिक स्विच बंदच ठेवावा .व्होल्टेज कमी जास्त होत असल्यास किंवा सप्लाय येत जात असल्यास मशीन तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवावे. तसेच वॉटर प्युरिफायर इलेक्ट्रिक स्विचद्वारे चालू करण्यापूर्वी ओवर हेड टॅंक मध्ये पुरेसे पाणी असल्याची खात्री करावी . मशिनचा सलग दिर्घकाळ वापर टाळावा.
- दरवर्षी किंवा ठराविक कालावधी नंतर वॉटर प्युरिफायरच्या कॅन्डल बदलणे आवश्यक असते, सदर काम तज्ञ व जाणकार व्यक्ती कडून करून घ्यावे.
-कोल्ड्रिंक व पॅक्ड ड्रिंकिंग वॉटरच्या बाटल्यांचा वापर पिण्याचे पाणी पुन्हा पुन्हा भरण्या करता अजिबात करू नये. त्या ऐवजी चांगल्या दर्जाच्या बोटल किंवा कंटेनर यांचा वापर करावा.
दिलेल्या माहितीत मशिनच्या कंपनी व मॉडेल अनुसार बदल आवश्यक असू शकतात.
वॉरंटी/गॅरंटी कार्ड व इन्स्ट्रक्शन मॅन्युअल काळजीपूर्वक वाचा.
नियम व अटी लागू*

Comments
Post a Comment