Skip to main content

AccuMan® कोकणचा ब्रॅन्ड ॲक्युमन

नमस्कार,मी सुखानंद कुलकर्णी  (बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स),  प्रोप्रायटर मनिष सोल्युशन्स  (गृहोपयोगी वस्तूंचे दालन),  तसेच AccuMan या रजिस्टर्ड ट्रेडमार्कचा ओनर.  गेली अनेक वर्षे गृहोपयोगी वस्तू विक्री करत व सेवा पुरवत असताना , नेमक्या कोणत्या गोष्टी विक्रेत्यांना व ग्राहकांना माहिती असायला हव्यात याचा चांगलाच अंदाज आला व त्या अनुषंगाने एक उपयुक्त संकलन तयार करायचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करत आहे.  आपणांस सदर माहिती आवडल्यास नक्कीच कमेंट, लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.  अधिक माहिती साठी संपर्क संपर्काची वेळ : सकाळी नऊ ते सायंकाळी सात (भारतीय प्रमाणवेळेनुसार) मनिष सोल्युशन्स डॉ. पत्की दवाखान्याचे मागे,  टि. बी. चाळीचे जवळ,  लांजा 416701 , जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र, इंडिया 9970593910 किंवा 9404763509 sukhanandkulkarnilanja@gmail.com manishsolutionslanja@gmail.com

इलेक्ट्रिक गिझर कसा वापरावा

 इलेक्ट्रिक गिझर कसा वापरावा

(इन्स्टंट इलेक्ट्रिक गिझर) 

जाहिरात

-इन्स्टॉलेशन पूर्वी उपलब्ध करायच्या गोष्टी 

_वॉटर टॅंक   इनलेट आऊटलेट कनेक्शन कॉक व हेक्स निपल सह

_इलेक्ट्रिक पॉवर पॉइंट कनेक्शन अर्थिंग सह 


-इन्स्टॉलेशनचे वेळी उपलब्ध करायच्या गोष्टी 

_वॉटर इनलेट आउटलेट पाईप 

_टेफलॉन टेप

_थ्री पिन टॉप केबल 

_इन्सुलेशन टेप

_स्क्रू व रावळ प्लग

(युनिटचे इन्स्टॉलेशन व मेंटेनन्स तज्ञ व्यक्ती कडून करून घेणे आवश्यक) 


-वॉटर प्रेशर अंदाजे ठरवा

_20 फुटांपेक्षा कमी..लो प्रेशर 

_20 फुटांपेक्षा जास्त..हाय प्रेशर 

(वॉटर प्रेशर लो असल्यास इलेक्ट्रिक गिझर इनलेट प्रेशर नटचे  कोणतेही सेटिंग करायची गरज शक्यतो नसते, 

वॉटर प्रेशर हाय असल्यास इलेक्ट्रिक गिझर इनलेट प्रेशर नटचे  सेटिंग करायची गरज भासू शकते ) 


 -इलेक्ट्रिक  सप्लाय घ्यायची काळजी  

_इलेक्ट्रिक गिझर चे वॅटेज 1000 ,2000, 3000 इतके असते, त्यामुळे पॉवर पॉइंट चे थेट  मिटर पासून कनेक्शन असावे,  तसेच त्यासाठी किमान 2.5 mm sq किंवा 4.0 mm sq ची वायर वापरावी .

_पॉवर पॉइंट 15 A लोड घेण्यास सक्षम असावा 

_फेज न्यूट्रल बरोबर अर्थिंग असणे (हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे)देखील महत्त्वाचे आहे, 

अर्थिंग नसल्यास शॉक लागू शकतो 


-इलेक्ट्रिक गिझर साठी घ्यायची विशेष काळजी

_युनिट सुरू असताना शक्यतो पाण्याच्या धारेला थेट स्पर्श टाळावा

_मेटल ऐवजी प्लास्टिक टॅप, बकेट, मग इत्यादीचा वापर करावा. 

_अर्थिंग सोबतच इ.एल.सी.बी. सारख्या उपकरणांचा वापर करावा

_शॉक किंवा तत्सम धोक्याचा संशय असल्यास इलेक्ट्रिक सप्लाय तत्काळ बंद करून तज्ञ तांत्रिकाकडून तपासणी वा दुरुस्ती करून घ्यावी

_बंदिस्त जागेत व सलग दिर्घकाळ वापर टाळावा

_वापराची जागा छोटी असल्यास युनिट सोबत एक्झॉस्ट फॅनचा वापर करावा


-इलेक्ट्रिक गिझर चालू बंद होण्याचा क्रम 

_सर्व प्रथम इनलेट वॉटर कॉक चालू करावा , त्यानंतर  इलेक्ट्रिक स्विच चालू करणे 

_गिझरवर  दोन इंडिकेटर असतात 

पहिला इलेक्ट्रिक सप्लाय चालू केल्याचा व दुसरा पाणी गरम होत असल्याचा ,पाणी गरम झाल्याचे इंडिकेशन मिळाल्यावर आउटलेट कॉक  मधून गरम पाणी घ्यावे

_वॉटर कॉक पूर्ण ओपन केल्यास पाणी कमी गरम तर अर्धवट ओपन केल्यास  जास्त गरम येते 

_वापर झाल्यावर इलेक्ट्रिक स्विच बंद करावे ,त्यानंतर वॉटर कॉक बंद करावा 

_इलेक्ट्रिक गिझर पाणी उपलब्ध असल्याची खात्री करून नंतरच वापर करावा 

यामध्ये मशिनच्या कंपनी व मॉडेल अनुसार बदल असू शकतात


-इलेक्ट्रिक गिझर चालू न होण्याची कारणे

-इलेक्ट्रिक सप्लाय उपलब्ध नसणे

-पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने युनिट मधील पाणी अतिरिक्त गरम होणे व युनिट हॅंग होणे

_पॉवर पॉईंट व्यवस्थित कार्यरत नसणे

याखेरीज अन्य कारण असल्यास इलेक्ट्रिक गिझर विक्रेत्याशी संपर्क साधावा

(योग्य कॅपॅसिटीची फ्यूज तार पॉवर पॉईंट मध्ये नसल्यास युनिट व्यवस्थित कार्य करत नाही असा अनुभव आहे) 


वॉरंटी / गॅरंटी कार्ड व इन्स्ट्रक्शन मॅन्युअल काळजीपूर्वक वाचा


अटी व नियम लागू*

Comments

Popular posts from this blog

वॉटर प्युरिफायर कसा वापरावा

 वॉटर प्युरिफायर कसा वापरावा? जाहिरात  -वॉटर प्युरिफायरचे अनेक प्रकार  उपलब्धत आहेत A=RO+UV     B=RO+UF C=RO+UV+UF D=only UV E=only UF F=UV+UF  -वॉटर प्युरिफायरची निवड - ओव्हरहेड टॅंकमधील  पाण्याचा T.D.S तपासून घेणे. बोअरवेलच्या   हाय  T.D.S  पाण्यासाठी A, B,C यापैकी एक  तर  विहिर /नदीच्या लो T.D.S पाण्यासाठी D,E,F यापैकी एक प्रकार निवडणे योग्य ठरते. साधारणतः T.D.S. 200ppm पेक्षा कमी प्रमाण असेल तर लो मानला जातो व 200ppm पेक्षा जास्त प्रमाण असेल तर हाय मानला जातो. या तपासणी अनुसार योग्य मॉडेल निवडावे.  वॉटर प्युरिफायरच्या  विविध कॅन्डल्स व त्यांची पाण्या संदर्भातील कार्ये - _प्री फिल्टर - दृश्य घटक  व गढूळपणा दूर करणे (अंदाजे कार्यकाल 06 महिने)  _सेडिमेंट फिल्टर - सूक्ष्म दृश्य घटक दूर करणे(अंदाजे कार्यकाल  12 महिने)  _कार्बन फिल्टर - क्लोरीन कमी  करणे व चव, वास सुधारणे (अंदाजे कार्यकाल  12 महिने)  _आर ओ मेंब्रेन - अतिरिक्त अनावश्यक जडत्व दूर करणे (अंदाजे  कार्यकाल...

घरगुती आटा चक्की कशी वापरावी

 घरगुती आटा चक्की (घरघंटी) कशी वापरावी?  जाहिरात -मशिन ठेवण्याची जागा सुटसुटीत व हवेशीर असावी. मशिन वापरताना भिंतीपासून एक - दोन फूट पुढे ओढून घ्यावे. मशिनचा पाण्याशी संपर्क टाळावा. मशिनचा सलग दिर्घकाळ वापर करू नये.  -मशिनला इलेक्ट्रिक सप्लाय देण्यासाठी पॉवर पॉईंटचा वापर करावा.अर्थिंग आवश्यक. मशिन सिंगल फेज सप्लायर चालते . थ्री फेज सप्लायची आवश्यकता नाही.एकाच वेळी घरघंटी सह इलेक्ट्रिक गिझर, पंप, वॉशिंग मशिन अशी उपकरणे एकदम वापरणे टाळावे.  -इलेक्ट्रिक सप्लाय व्होल्टेज कमी जास्त होत असल्यास इलेक्ट्रिक सप्लाय येत जात असल्यास, जोरदार पाऊस व वीजा चमकणे अशा वेळी मशिन तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवावे. अशा वेळी थेट पीन टॉप काढून ठेवणे हितावह.  -शक्यतो आटा चक्कीचा वापर सकाळी 10 ते 6 या वेळे दरम्यान करावा.  -एका वेळी 4 किलो पेक्षा जास्त धान्य दळण्यास लावू नये -तसेच सलग 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मशिन चालू ठेवू नये (अन्यथा मशिन ओव्हरलोड होऊ शकते)  -नाचणी , वरी ,कणी अशी अति बारिक धान्य वाटीने हळू हळू टाकावी . -कोणत्याही परिस्तिथतीत जाड पीठ पुन्हा बारीक करण्यासाठी ह...

गॅस गिझर कसा वापरावा?

   गॅस गिझर कसा वापरावा?  जाहिरात -इन्स्टॉलेशनचे पूर्वी उपलब्ध करायच्या गोष्टी: _वॉटर टॅंक इनलेट आऊटलेट कनेक्शन कॉक व हेक्स निपल सह _गॅस सिलेंडर कनेक्शन रेग्युलेटर सह -इन्स्टॉलेशनचे वेळी उपलब्ध करायच्या गोष्टी : _वॉटर इनलेट व आऊटलेट पाईप _टेफलॉन टेप  _गॅस पाईप  _होस क्लिप्स _सेल जोडी _स्क्रू व रावळ प्लग (युनिटचे इन्स्टॉलेशन व मेन्टेनन्स तज्ञ व्यक्ती कडून करून घेणे आवश्यक आहे)  -वॉटर प्रेशर अंदाजे ठराव : वॉटर टॅंक व गॅस गिझर यामधील व्हर्टिकल डिस्टन्स _4 ते 20 फुट..लो प्रेशर _20 ते 100 फूट..हाय प्रेशर (या अनुसार लो प्रेशर मॉडेल खरेदी करायचे की हाय प्रेशर ते ठरवू शकता)  -गॅस सप्लाय घ्यायची काळजी _एक्सपायरी डेट न झालेला सिलेंडर (टाकी वर उल्लेख असतो)  _गॅस सिलेंडर एक्झिट नोझल मधील वायसरची तपासणी  _गॅस रेग्युलेटरची अधिकृत कंपनीकडून उपलब्धता  _गॅस पाईपची 5 फुटापर्यंत मर्यादा (यापेक्षा जास्त असल्यास कॉपर पाईप वापरू शकता)  _गॅस गिझर एन्ट्री नोझल मधील वायसरची तपासणी   _गॅस गिझरसाठी "हवेशीर व सुटसुटीत जागा" (हा फार महत्त्वाचा मुद्दा ...