Skip to main content

AccuMan® कोकणचा ब्रॅन्ड ॲक्युमन

नमस्कार,मी सुखानंद कुलकर्णी  (बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स),  प्रोप्रायटर मनिष सोल्युशन्स  (गृहोपयोगी वस्तूंचे दालन),  तसेच AccuMan या रजिस्टर्ड ट्रेडमार्कचा ओनर.  गेली अनेक वर्षे गृहोपयोगी वस्तू विक्री करत व सेवा पुरवत असताना , नेमक्या कोणत्या गोष्टी विक्रेत्यांना व ग्राहकांना माहिती असायला हव्यात याचा चांगलाच अंदाज आला व त्या अनुषंगाने एक उपयुक्त संकलन तयार करायचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करत आहे.  आपणांस सदर माहिती आवडल्यास नक्कीच कमेंट, लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.  अधिक माहिती साठी संपर्क संपर्काची वेळ : सकाळी नऊ ते सायंकाळी सात (भारतीय प्रमाणवेळेनुसार) मनिष सोल्युशन्स डॉ. पत्की दवाखान्याचे मागे,  टि. बी. चाळीचे जवळ,  लांजा 416701 , जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र, इंडिया 9970593910 किंवा 9404763509 sukhanandkulkarnilanja@gmail.com manishsolutionslanja@gmail.com

इंडक्शन कुकटॉप कसा वापरावा

 इंडक्शन कुकटॉप कसा वापरावा? 

जाहिरात

_मशिन ठेवण्याची जागा सुटसुटित असावी. कागद किंवा कापडावर  मशिन ठेवू नये .

_हाय व्होल्टेज किंवा लो व्होल्टेज मुळे मशिन  एरर (E) दाखवत असल्यास मशिन तात्पुरत्या स्वरूपांत बंद ठेवावे.

_इलेक्ट्रिक सप्लाय सतत येत - जात असल्यास, डीम - फुल होत असल्यास मशिन तात्पुरत्या स्वरूपांत बंद ठेवावे.

_सदर मशिन व्होल्टेज फ्लक्चुएशन मुळे खराब होण्याची जास्त शक्यता असते. 

_इलेक्ट्रिक सप्लाय देण्यासाठी अर्थिंग असलेल्या पॉवर पॉईंटचा (त्यामध्ये योग्य क्षमतेची फ्यूज तार असणे आवश्यक) वापर करावा.

_मशिन ऑन करण्यापूर्वी भांड्यामध्ये  पदार्थ असणे आवश्यक आहे .रिकामे भांडे ठेवून मशिन अॉन करू नये. 

_की बोर्ड वा टच स्क्रिन ऑपरेट करण्यासाठी इंडेक्स फिंगरचा वापर करावा .

_मशिनचा वापर झाल्यावर मशिन वरील भांडे तत्काळ उतरून ठेवावे.

_ग्लास सरफेस गरम असताना गार पाण्याशी संपर्क होऊ नये . (काच गरम असताना पाण्याने पुसू नये) 

_फंक्शन व वॅटेज ठरवताना भांडे - आकार , पदार्थ व वस्तुमान लक्षात घ्यावे. 

_कंट्रोल  पॅनलचा योग्य वापर करावा . 

_सपाट तळ असलेली स्टेनलेस स्टिलची किंवा इंडक्शन कम्पॅटिबल असा उल्लेख असलेली भांडी वापरावी ,व्यास :12cm  ते   26cm, क्षमता :4 लिटर  पर्यंत असणारी. 

_मशिनची पडझड होणार नाही व मशिनमध्ये द्रव वा अन्य पदार्थ जाणार नाही याची दक्षता घ्यावी. 

_पीसीबी म्हणजेच सर्किट शॉर्ट होऊ नये म्हणून मुंग्या, झुरळ, पाल किंवा तत्सम किटक/प्राणी मशिनमध्ये  जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 

_मशिनचा सलग दीर्घकाळ व अवाजवी वापर करू नये .

दिलेल्या माहितीत मशिनच्या कंपनी व मॉडेल अनुसार बदल आवश्यक असू शकतात. 

गॅरंटी वॉरंटी कार्ड व इन्स्ट्रक्शन मॅन्युअल काळजीपूर्वक वाचा . 


नियम व अटी लागू*

Comments

Popular posts from this blog

वॉटर प्युरिफायर कसा वापरावा

 वॉटर प्युरिफायर कसा वापरावा? जाहिरात  -वॉटर प्युरिफायरचे अनेक प्रकार  उपलब्धत आहेत A=RO+UV     B=RO+UF C=RO+UV+UF D=only UV E=only UF F=UV+UF  -वॉटर प्युरिफायरची निवड - ओव्हरहेड टॅंकमधील  पाण्याचा T.D.S तपासून घेणे. बोअरवेलच्या   हाय  T.D.S  पाण्यासाठी A, B,C यापैकी एक  तर  विहिर /नदीच्या लो T.D.S पाण्यासाठी D,E,F यापैकी एक प्रकार निवडणे योग्य ठरते. साधारणतः T.D.S. 200ppm पेक्षा कमी प्रमाण असेल तर लो मानला जातो व 200ppm पेक्षा जास्त प्रमाण असेल तर हाय मानला जातो. या तपासणी अनुसार योग्य मॉडेल निवडावे.  वॉटर प्युरिफायरच्या  विविध कॅन्डल्स व त्यांची पाण्या संदर्भातील कार्ये - _प्री फिल्टर - दृश्य घटक  व गढूळपणा दूर करणे (अंदाजे कार्यकाल 06 महिने)  _सेडिमेंट फिल्टर - सूक्ष्म दृश्य घटक दूर करणे(अंदाजे कार्यकाल  12 महिने)  _कार्बन फिल्टर - क्लोरीन कमी  करणे व चव, वास सुधारणे (अंदाजे कार्यकाल  12 महिने)  _आर ओ मेंब्रेन - अतिरिक्त अनावश्यक जडत्व दूर करणे (अंदाजे  कार्यकाल...

घरगुती आटा चक्की कशी वापरावी

 घरगुती आटा चक्की (घरघंटी) कशी वापरावी?  जाहिरात -मशिन ठेवण्याची जागा सुटसुटीत व हवेशीर असावी. मशिन वापरताना भिंतीपासून एक - दोन फूट पुढे ओढून घ्यावे. मशिनचा पाण्याशी संपर्क टाळावा. मशिनचा सलग दिर्घकाळ वापर करू नये.  -मशिनला इलेक्ट्रिक सप्लाय देण्यासाठी पॉवर पॉईंटचा वापर करावा.अर्थिंग आवश्यक. मशिन सिंगल फेज सप्लायर चालते . थ्री फेज सप्लायची आवश्यकता नाही.एकाच वेळी घरघंटी सह इलेक्ट्रिक गिझर, पंप, वॉशिंग मशिन अशी उपकरणे एकदम वापरणे टाळावे.  -इलेक्ट्रिक सप्लाय व्होल्टेज कमी जास्त होत असल्यास इलेक्ट्रिक सप्लाय येत जात असल्यास, जोरदार पाऊस व वीजा चमकणे अशा वेळी मशिन तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवावे. अशा वेळी थेट पीन टॉप काढून ठेवणे हितावह.  -शक्यतो आटा चक्कीचा वापर सकाळी 10 ते 6 या वेळे दरम्यान करावा.  -एका वेळी 4 किलो पेक्षा जास्त धान्य दळण्यास लावू नये -तसेच सलग 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मशिन चालू ठेवू नये (अन्यथा मशिन ओव्हरलोड होऊ शकते)  -नाचणी , वरी ,कणी अशी अति बारिक धान्य वाटीने हळू हळू टाकावी . -कोणत्याही परिस्तिथतीत जाड पीठ पुन्हा बारीक करण्यासाठी ह...

गॅस गिझर कसा वापरावा?

   गॅस गिझर कसा वापरावा?  जाहिरात -इन्स्टॉलेशनचे पूर्वी उपलब्ध करायच्या गोष्टी: _वॉटर टॅंक इनलेट आऊटलेट कनेक्शन कॉक व हेक्स निपल सह _गॅस सिलेंडर कनेक्शन रेग्युलेटर सह -इन्स्टॉलेशनचे वेळी उपलब्ध करायच्या गोष्टी : _वॉटर इनलेट व आऊटलेट पाईप _टेफलॉन टेप  _गॅस पाईप  _होस क्लिप्स _सेल जोडी _स्क्रू व रावळ प्लग (युनिटचे इन्स्टॉलेशन व मेन्टेनन्स तज्ञ व्यक्ती कडून करून घेणे आवश्यक आहे)  -वॉटर प्रेशर अंदाजे ठराव : वॉटर टॅंक व गॅस गिझर यामधील व्हर्टिकल डिस्टन्स _4 ते 20 फुट..लो प्रेशर _20 ते 100 फूट..हाय प्रेशर (या अनुसार लो प्रेशर मॉडेल खरेदी करायचे की हाय प्रेशर ते ठरवू शकता)  -गॅस सप्लाय घ्यायची काळजी _एक्सपायरी डेट न झालेला सिलेंडर (टाकी वर उल्लेख असतो)  _गॅस सिलेंडर एक्झिट नोझल मधील वायसरची तपासणी  _गॅस रेग्युलेटरची अधिकृत कंपनीकडून उपलब्धता  _गॅस पाईपची 5 फुटापर्यंत मर्यादा (यापेक्षा जास्त असल्यास कॉपर पाईप वापरू शकता)  _गॅस गिझर एन्ट्री नोझल मधील वायसरची तपासणी   _गॅस गिझरसाठी "हवेशीर व सुटसुटीत जागा" (हा फार महत्त्वाचा मुद्दा ...