Skip to main content

AccuMan® कोकणचा ब्रॅन्ड ॲक्युमन

नमस्कार,मी सुखानंद कुलकर्णी  (बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स),  प्रोप्रायटर मनिष सोल्युशन्स  (गृहोपयोगी वस्तूंचे दालन),  तसेच AccuMan या रजिस्टर्ड ट्रेडमार्कचा ओनर.  गेली अनेक वर्षे गृहोपयोगी वस्तू विक्री करत व सेवा पुरवत असताना , नेमक्या कोणत्या गोष्टी विक्रेत्यांना व ग्राहकांना माहिती असायला हव्यात याचा चांगलाच अंदाज आला व त्या अनुषंगाने एक उपयुक्त संकलन तयार करायचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करत आहे.  आपणांस सदर माहिती आवडल्यास नक्कीच कमेंट, लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.  अधिक माहिती साठी संपर्क संपर्काची वेळ : सकाळी नऊ ते सायंकाळी सात (भारतीय प्रमाणवेळेनुसार) मनिष सोल्युशन्स डॉ. पत्की दवाखान्याचे मागे,  टि. बी. चाळीचे जवळ,  लांजा 416701 , जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र, इंडिया 9970593910 किंवा 9404763509 sukhanandkulkarnilanja@gmail.com manishsolutionslanja@gmail.com

इन्व्हर्टर व बॅटरी - निवड कशी करावी

इन्व्हर्टर व बॅटरी यांची निवड कशी करावी?

आजकल बहुतेक लोकं लोडशेडिंगला कंटाळून इन्व्हर्टर व बॅटरी घेण्याचा निर्णय घेत आहेत. पण नक्की किती क्षमतेचा इन्व्हर्टर व बॅटरी घ्यावी याबद्दल साशंक आहेत. या शंका दूर करायचा प्रयत्न करत आहे. टेक्निकल भाषेत साईनवेव्ह सर्किट व कॉपर ट्रान्स्फॉर्मर असलेला इन्व्हर्टर चांगला. आणि टॉवर ट्युब्युलर व वजनदार बॅटरी चांगली. अति पाऊस व वीजा चमकत असताना  मेन स्विच बंद करणे व नंतर न विसरता चालू करणे हितावह ठरते. तसेच इन्व्हर्टर व बॅटरी खरेदी करण्यापूर्वी ठराविक लोडचे वेगळे वायरिंग (इन्व्हर्टर व बॅटरीला जोडण्यासाठी) व चार्जिंग पॉईंट ही पूर्वतयारी करून घ्यावी लागते. इन्व्हर्टर व बॅटरी साठी हवेशीर व सुटसुटीत जागा अपेक्षित असते. 


"आंपणास एकावेळी जास्तीत जास्त किती लोड चालवायचा आहे यानुसार इन्व्हर्टरची आवश्यक क्षमता ठरवता येते." उदाहरणार्थ दोन फॅनचे दोनशे वॅट (प्रति फॅन शंभर वॅट प्रमाणे), चार ट्युबचे दोनशे चाळीस वॅट (प्रति ट्युब चाळीस व चोक वीस वॅट प्रमाणे), चार एलईडी बल्बचे चाळीस वॅट (प्रति बल्ब दहा वॅट प्रमाणे) असा एकूण चारशे ऐशी वॅटचा लोड होतो. याचे रूपांतर रिव्हर्स कॅलक्युलेशन नुसार सहाशे व्ही ए असे होते. (वॅटला पॉईंट आठने भागल्यास व्ही ए होते अंदाजे). म्हणजेच दोन फॅन, चार ट्युब व चार एलईडीचा एकत्रित लोड साधारणतः सहाशे व्ही ए (व्होट अॅम्पिअर) असतो. सध्या सातशे, साडे आठशे, एक हजार व्ही ए इन्व्हर्टर उपलब्ध आहेत बाजारपेठेत, त्यापैकी साडे आठशे व्ही ए चे मॉडेल निवडायला हरकत नाही. 


"आंपणास सदर ठराविक लोड सलग किती तास चालवायचा आहे यानुसार बॅटरीची आवश्यक क्षमता ठरवता येते." साधारणतः दिडशे ए एच (अॅम्पिअर हावर) ची बॅटरी पूर्ण चार्ज असल्यास साडे चारशे वॅटच्या लोडसाठी तीन तास (पंधरा मिनिटे कमी जास्त) बॅक अप देते. एका वेळी जोडलेली सर्व उपकरणे चालू न ठेवता दोन ऐवजी एक फॅन, ट्युब ऐवजी एल ई डी बल्बचा वापर केल्यास (दिडशे वॅट अ‍ॅक्टिव्ह लोड गृहीत धरून) सदर बॅकअप अगदी आठ नऊ तास मिळू शकतो. बॅटरी पहिल्या वर्षी पेक्षा नंतर नंतरच्या वर्षी बॅकअप कमी देत जाते. व बॅटरीचे अपेक्षित आयुष्य पाच वर्षे असते, त्यानंतर बॅटरी बदलावी लागते. बॅटरी मध्ये दर पाच सहा महिन्यांनी डिस्टिल्ड वॉटर लेव्हल करणे गरजेचे आहे. बाजारपेठेतील शंभर, दिडशे, दोनशे यातील दिडशे ए एच ची बॅटरी लोकप्रिय आहे. 


शक्यतो बॅटरीचा पिरयॉडीक मेन्टेनन्स व्यवस्थित ठेवल्यास व चांगल्या दर्जाची बॅटरी खरेदी केलेली असल्यास बॅटरी मध्ये बिघाड व्हायची शक्यता कमी असते. चांगल्या दर्जाच्या इन्व्हर्टर मध्ये देखील अति पाऊस व वीजा चमकत असताना मेन स्विच तात्पुरते बंद केले गेल्यास बिघाड होण्याची शक्यता कमी. कधी अनपेक्षित रित्या व्होल्टेज कमी जास्त झाल्यास बिघाड संभवतो. बिघाड झालाच तर मात्र तालुक्याच्या ठिकाणी सर्व्हिस सेंटर नसल्याने व लोकल मेकॅनिकना स्पेअर पार्ट्स सहज उपलब्ध होत नसल्याने दुरुस्ती साठी चार, आठ किंवा त्याहून अधिक दिवस लागतात. म्हणून बिघाड होऊच नये यासाठी घ्यावी लागणारी काळजी अगदी कटाक्षाने घ्यावी. 

Comments

Popular posts from this blog

वॉटर प्युरिफायर कसा वापरावा

 वॉटर प्युरिफायर कसा वापरावा? जाहिरात  -वॉटर प्युरिफायरचे अनेक प्रकार  उपलब्धत आहेत A=RO+UV     B=RO+UF C=RO+UV+UF D=only UV E=only UF F=UV+UF  -वॉटर प्युरिफायरची निवड - ओव्हरहेड टॅंकमधील  पाण्याचा T.D.S तपासून घेणे. बोअरवेलच्या   हाय  T.D.S  पाण्यासाठी A, B,C यापैकी एक  तर  विहिर /नदीच्या लो T.D.S पाण्यासाठी D,E,F यापैकी एक प्रकार निवडणे योग्य ठरते. साधारणतः T.D.S. 200ppm पेक्षा कमी प्रमाण असेल तर लो मानला जातो व 200ppm पेक्षा जास्त प्रमाण असेल तर हाय मानला जातो. या तपासणी अनुसार योग्य मॉडेल निवडावे.  वॉटर प्युरिफायरच्या  विविध कॅन्डल्स व त्यांची पाण्या संदर्भातील कार्ये - _प्री फिल्टर - दृश्य घटक  व गढूळपणा दूर करणे (अंदाजे कार्यकाल 06 महिने)  _सेडिमेंट फिल्टर - सूक्ष्म दृश्य घटक दूर करणे(अंदाजे कार्यकाल  12 महिने)  _कार्बन फिल्टर - क्लोरीन कमी  करणे व चव, वास सुधारणे (अंदाजे कार्यकाल  12 महिने)  _आर ओ मेंब्रेन - अतिरिक्त अनावश्यक जडत्व दूर करणे (अंदाजे  कार्यकाल...

घरगुती आटा चक्की कशी वापरावी

 घरगुती आटा चक्की (घरघंटी) कशी वापरावी?  जाहिरात -मशिन ठेवण्याची जागा सुटसुटीत व हवेशीर असावी. मशिन वापरताना भिंतीपासून एक - दोन फूट पुढे ओढून घ्यावे. मशिनचा पाण्याशी संपर्क टाळावा. मशिनचा सलग दिर्घकाळ वापर करू नये.  -मशिनला इलेक्ट्रिक सप्लाय देण्यासाठी पॉवर पॉईंटचा वापर करावा.अर्थिंग आवश्यक. मशिन सिंगल फेज सप्लायर चालते . थ्री फेज सप्लायची आवश्यकता नाही.एकाच वेळी घरघंटी सह इलेक्ट्रिक गिझर, पंप, वॉशिंग मशिन अशी उपकरणे एकदम वापरणे टाळावे.  -इलेक्ट्रिक सप्लाय व्होल्टेज कमी जास्त होत असल्यास इलेक्ट्रिक सप्लाय येत जात असल्यास, जोरदार पाऊस व वीजा चमकणे अशा वेळी मशिन तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवावे. अशा वेळी थेट पीन टॉप काढून ठेवणे हितावह.  -शक्यतो आटा चक्कीचा वापर सकाळी 10 ते 6 या वेळे दरम्यान करावा.  -एका वेळी 4 किलो पेक्षा जास्त धान्य दळण्यास लावू नये -तसेच सलग 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मशिन चालू ठेवू नये (अन्यथा मशिन ओव्हरलोड होऊ शकते)  -नाचणी , वरी ,कणी अशी अति बारिक धान्य वाटीने हळू हळू टाकावी . -कोणत्याही परिस्तिथतीत जाड पीठ पुन्हा बारीक करण्यासाठी ह...

गॅस गिझर कसा वापरावा?

   गॅस गिझर कसा वापरावा?  जाहिरात -इन्स्टॉलेशनचे पूर्वी उपलब्ध करायच्या गोष्टी: _वॉटर टॅंक इनलेट आऊटलेट कनेक्शन कॉक व हेक्स निपल सह _गॅस सिलेंडर कनेक्शन रेग्युलेटर सह -इन्स्टॉलेशनचे वेळी उपलब्ध करायच्या गोष्टी : _वॉटर इनलेट व आऊटलेट पाईप _टेफलॉन टेप  _गॅस पाईप  _होस क्लिप्स _सेल जोडी _स्क्रू व रावळ प्लग (युनिटचे इन्स्टॉलेशन व मेन्टेनन्स तज्ञ व्यक्ती कडून करून घेणे आवश्यक आहे)  -वॉटर प्रेशर अंदाजे ठराव : वॉटर टॅंक व गॅस गिझर यामधील व्हर्टिकल डिस्टन्स _4 ते 20 फुट..लो प्रेशर _20 ते 100 फूट..हाय प्रेशर (या अनुसार लो प्रेशर मॉडेल खरेदी करायचे की हाय प्रेशर ते ठरवू शकता)  -गॅस सप्लाय घ्यायची काळजी _एक्सपायरी डेट न झालेला सिलेंडर (टाकी वर उल्लेख असतो)  _गॅस सिलेंडर एक्झिट नोझल मधील वायसरची तपासणी  _गॅस रेग्युलेटरची अधिकृत कंपनीकडून उपलब्धता  _गॅस पाईपची 5 फुटापर्यंत मर्यादा (यापेक्षा जास्त असल्यास कॉपर पाईप वापरू शकता)  _गॅस गिझर एन्ट्री नोझल मधील वायसरची तपासणी   _गॅस गिझरसाठी "हवेशीर व सुटसुटीत जागा" (हा फार महत्त्वाचा मुद्दा ...