Skip to main content

AccuMan® कोकणचा ब्रॅन्ड ॲक्युमन

नमस्कार,मी सुखानंद कुलकर्णी  (बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स),  प्रोप्रायटर मनिष सोल्युशन्स  (गृहोपयोगी वस्तूंचे दालन),  तसेच AccuMan या रजिस्टर्ड ट्रेडमार्कचा ओनर.  गेली अनेक वर्षे गृहोपयोगी वस्तू विक्री करत व सेवा पुरवत असताना , नेमक्या कोणत्या गोष्टी विक्रेत्यांना व ग्राहकांना माहिती असायला हव्यात याचा चांगलाच अंदाज आला व त्या अनुषंगाने एक उपयुक्त संकलन तयार करायचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करत आहे.  आपणांस सदर माहिती आवडल्यास नक्कीच कमेंट, लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.  अधिक माहिती साठी संपर्क संपर्काची वेळ : सकाळी नऊ ते सायंकाळी सात (भारतीय प्रमाणवेळेनुसार) मनिष सोल्युशन्स डॉ. पत्की दवाखान्याचे मागे,  टि. बी. चाळीचे जवळ,  लांजा 416701 , जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र, इंडिया 9970593910 किंवा 9404763509 sukhanandkulkarnilanja@gmail.com manishsolutionslanja@gmail.com

कोणता गिझर खरेदी करावा, गॅस की इलेक्ट्रिक?

कोणता गिझर खरेदी करावा?

गॅस गिझर की इलेक्ट्रिक गिझर? 

गिझर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना

हमखास पडणारा हा प्रश्न.

त्यात पावसाळा व हिवाळा सुरु झाला की 

"बारीश और ठंड मे नहाने के लिये

 जिगर के साथ साथ गिझर भी जरूरी है" 

या उक्तीप्रमाणे बाजारपेठेत गिझरची 

लक्षणीय विक्री होत असते. 

चला तर मग बघूया, 

गॅस व इलेक्ट्रिक गिझरची ढोबळमानाने तुलना.

(गॅस गिझर बरोबर तुलना करताना इथे इन्स्टंट इलेक्ट्रिक गिझर गृहीत धरला आहे) 


गिझर कोणताही असो, प्लंबिग रेडी असणे गरजेचे आहे, म्हणजेच वॉटर इनलेट व आऊटलेट रेडी कनेक्शन. फक्त गॅस सप्लाय वर चालतो तो गॅस गिझर, तर इलेक्ट्रिक सप्लाय वर चालतो तो इलेक्ट्रिक गिझर. म्हणजेच आपल्या कडे सहज व पुरेसे उपलब्ध होणारे इंधन कोणते हा पहिला मुद्दा. 


दुसरा मुद्दा म्हणजे उपलब्ध जागा, गॅस गिझरचा आकार इलेक्ट्रिक गिझर पेक्षा लांबी, रुंदी, उंची लक्षात घेता मोठा असतो. तसेच गॅस गिझर साठी जास्त हवेशीर व सुटसुटीत जागा आवश्यक आहे. 


सुरूवातीची किंमत व नंतरचा इंधन खर्च हा तिसरा मुद्दा. नक्कीच गॅस गिझरचा दर हा इलेक्ट्रिक गिझर पेक्षा जास्त असणार आहे. पण सध्याचा गॅस सिलिंडरचा दर व इलेक्ट्रिक युनिटचा दर लक्षात घेता एका छोटय़ा कुटुंबासाठी नंतरच्या इंधन खर्चात कोणत्याही प्रकारचा गिझर घेतला तरी विशेष मोठी बचत होईल  असे वाटत नाही. (ही तुलना प्रत्येक वेळी वेगवेगळी असणार आहे, दरवर्षी थोड्या सवलतीच्या दरांत मिळणारे सिलेंडर किती.. स्वयंपाक व पाणी गरम करणे दोन्ही साठी गॅसचा वापर केल्यास ते पुरतात का // पाणी गरम करणे साठी इलेक्ट्रिसिटीचा वापर केल्यास दरमहा खर्ची पडणाऱ्या अतिरिक्त युनिट मुळे प्रति युनिटचा दर बदलतो का वगैरे वगैरे) तरीही याची गोळाबेरीज प्रत्येक जण पुढील प्रमाणे करु शकतो : गॅस गिझर द्वारे एका गॅस सिलेंडर वर टप्प्याटप्प्याने अंदाजे सात हजार लिटर पाणी  गरम होऊ शकते, थोडक्यात तीन ते चार महिने एक सिलेंडर पुरु शकतो //  इलेक्ट्रिक गिझर द्वारे पाणी गरम करताना कॉईल तीन हजार वॅटची  असल्यास दर वीस मिनिटाला एक युनिट खर्ची पडते. छोट्या कुटुंबासाठी सरासरी दररोज एकत्रित रित्या पाऊण तास  इलेक्ट्रिक गिझरचा वापर झाला तर महिन्याला सत्तरच्या आसपास युनिट खर्ची पडू शकतात : गॅस सिलेंडर व इलेक्ट्रिक युनिट याचा दर लक्षात घेऊन येणाऱ्या खर्चाचा अंदाज घेऊ शकता.  


नळ चालू करताच गॅस गिझर आपोआप सुरू होतो व नळ बंद करताच गॅस गिझर आपोआप बंद होतो. तसेच बहुतांश गॅस गिझर वर शेगडी प्रमाणे गॅस कमी जास्त करणारे बटण व दोन किंवा तीन बर्नर एकाच वेळी कार्यान्वित करायचा विकल्प येतो. बहुतांश इलेक्ट्रिक गिझर वर वॅटेज कमी जास्त करण्याचा विकल्प नसतो, तसेच नळा सोबत इलेक्ट्रिक गिझर स्विच ऑन / अॉफ ही प्रक्रिया स्वतंत्र पणे करावी लागते. थोडक्यात स्वयंचलित व वेगवान हा चौथा मुद्दा धरल्यास गॅस गिझर हा इलेक्ट्रिक गिझर पेक्षा वरचढ ठरतो. 


मुद्दा क्रमांक पाच - अंतर्गत देखभाल 

गॅस गिझर देखभाल व दुरुस्ती साठी उपलब्ध होणाऱ्या मेकॅनिकची संख्या काही ठिकाणी तुलनेने कमी आहे. गॅस गिझर मध्ये कॅबिनेट, चिमणी, हिट एक्स्चेंजर, बर्नर, गॅस वॉटर इंटरलॉक व्हॉल्व, मॅग्नेटिक बुलेट, रिड स्विच, सोलेनॉईड व्हॉल्व, इग्निशन बॉक्स, बॅटरी बॉक्स, चाईल्ड लॉक स्विच, टेम्परेचर कट अॉफ असे संख्येने जास्त पार्ट्स असतात व रचना इलेक्ट्रिक गिझर एवढी सोपी नसते. 

इलेक्ट्रिक गिझर देखभाल व दुरुस्ती चांगला इलेक्ट्रिशियन सहज करू शकतो. इलेक्ट्रिक गिझर मध्ये कॅबिनेट, हिट सिंक वूल, टॅंक, कॉईल, टेम्परेचर कट अॉफ, थर्मोस्टॅट, मेन्स कॉर्ड असे मोजके पार्ट्स असतात व गॅस गिझरच्या तुलनेत सोपी सुटसुटीत रचना असते. 

चांगल्या दर्जाचा गिझर (गॅस किंवा इलेक्ट्रिक) विश्वासू ठिकाणाहून खरेदी केल्यास व जाणकार व्यक्ती कडून बसवून घेतल्यास विशेष अडचण येण्याची शक्यता तशी कमीच. 


मुद्दा क्रमांक सहा - सुरक्षितता व काळजी

बहुतांश गॅस गिझर मध्ये वीस मिनिटांचा टायमर, सत्तर डिग्रीचा कटअॉफ, फ्लेम फेल्युअर सेन्सर, गॅस वॉटर इंटरलॉक इत्यादी वैशिष्ट्ये आहेत. फक्त गॅस गिझर साठी हवेशीर व सुटसुटीत जागा व बाथरुमला पुरेशी मोठी उघडी खिडकी असणे अत्यावश्यक आहे . 

तसेच बहुतांश इलेक्ट्रिक गिझर मध्ये देखील सत्तर डिग्रीच्या आसपासचा कटअॉफ, अॅटोमॅटिक अॉन अॉफ होणारा थर्मोस्टॅट इत्यादी वैशिष्ट्ये आहेत. फक्त इलेक्ट्रिक गिझर साठी प्रॉपर अर्थिन्ग असणे आवश्यक आहे. 

कोणतेही उपकरण असो, काम सोपे होत असले तरी संभाव्य धोके ओळखून काळजी घेतलीच पाहिजे. म्हणजे अपघात टाळता येतील. हवेशीर व सुटसुटीत जागा नसेल व बाथरुमला पुरेशी मोठी उघडी खिडकी नसेल तर गॅस गिझर वापरु नये. तसेच प्रॉपर अर्थिन्ग नसेल तर इलेक्ट्रिक गिझर वापरु नये. 


टिप:  प्रत्येक कंपनी, मॉडेल अनुसार उपकरणाच्या वैशिष्ट्ये व मर्यादा यामध्ये फरक असू शकतो. ग्राहकांनी यासंबंधी अधिक माहिती संबंधित संकेतस्थळ, ग्राहक सेवा केंद्र किंवा विक्रेता, तंत्रज्ञ यांचे कडून घ्यावी. 

Comments

Popular posts from this blog

वॉटर प्युरिफायर कसा वापरावा

 वॉटर प्युरिफायर कसा वापरावा? जाहिरात  -वॉटर प्युरिफायरचे अनेक प्रकार  उपलब्धत आहेत A=RO+UV     B=RO+UF C=RO+UV+UF D=only UV E=only UF F=UV+UF  -वॉटर प्युरिफायरची निवड - ओव्हरहेड टॅंकमधील  पाण्याचा T.D.S तपासून घेणे. बोअरवेलच्या   हाय  T.D.S  पाण्यासाठी A, B,C यापैकी एक  तर  विहिर /नदीच्या लो T.D.S पाण्यासाठी D,E,F यापैकी एक प्रकार निवडणे योग्य ठरते. साधारणतः T.D.S. 200ppm पेक्षा कमी प्रमाण असेल तर लो मानला जातो व 200ppm पेक्षा जास्त प्रमाण असेल तर हाय मानला जातो. या तपासणी अनुसार योग्य मॉडेल निवडावे.  वॉटर प्युरिफायरच्या  विविध कॅन्डल्स व त्यांची पाण्या संदर्भातील कार्ये - _प्री फिल्टर - दृश्य घटक  व गढूळपणा दूर करणे (अंदाजे कार्यकाल 06 महिने)  _सेडिमेंट फिल्टर - सूक्ष्म दृश्य घटक दूर करणे(अंदाजे कार्यकाल  12 महिने)  _कार्बन फिल्टर - क्लोरीन कमी  करणे व चव, वास सुधारणे (अंदाजे कार्यकाल  12 महिने)  _आर ओ मेंब्रेन - अतिरिक्त अनावश्यक जडत्व दूर करणे (अंदाजे  कार्यकाल...

घरगुती आटा चक्की कशी वापरावी

 घरगुती आटा चक्की (घरघंटी) कशी वापरावी?  जाहिरात -मशिन ठेवण्याची जागा सुटसुटीत व हवेशीर असावी. मशिन वापरताना भिंतीपासून एक - दोन फूट पुढे ओढून घ्यावे. मशिनचा पाण्याशी संपर्क टाळावा. मशिनचा सलग दिर्घकाळ वापर करू नये.  -मशिनला इलेक्ट्रिक सप्लाय देण्यासाठी पॉवर पॉईंटचा वापर करावा.अर्थिंग आवश्यक. मशिन सिंगल फेज सप्लायर चालते . थ्री फेज सप्लायची आवश्यकता नाही.एकाच वेळी घरघंटी सह इलेक्ट्रिक गिझर, पंप, वॉशिंग मशिन अशी उपकरणे एकदम वापरणे टाळावे.  -इलेक्ट्रिक सप्लाय व्होल्टेज कमी जास्त होत असल्यास इलेक्ट्रिक सप्लाय येत जात असल्यास, जोरदार पाऊस व वीजा चमकणे अशा वेळी मशिन तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवावे. अशा वेळी थेट पीन टॉप काढून ठेवणे हितावह.  -शक्यतो आटा चक्कीचा वापर सकाळी 10 ते 6 या वेळे दरम्यान करावा.  -एका वेळी 4 किलो पेक्षा जास्त धान्य दळण्यास लावू नये -तसेच सलग 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मशिन चालू ठेवू नये (अन्यथा मशिन ओव्हरलोड होऊ शकते)  -नाचणी , वरी ,कणी अशी अति बारिक धान्य वाटीने हळू हळू टाकावी . -कोणत्याही परिस्तिथतीत जाड पीठ पुन्हा बारीक करण्यासाठी ह...

गॅस गिझर कसा वापरावा?

   गॅस गिझर कसा वापरावा?  जाहिरात -इन्स्टॉलेशनचे पूर्वी उपलब्ध करायच्या गोष्टी: _वॉटर टॅंक इनलेट आऊटलेट कनेक्शन कॉक व हेक्स निपल सह _गॅस सिलेंडर कनेक्शन रेग्युलेटर सह -इन्स्टॉलेशनचे वेळी उपलब्ध करायच्या गोष्टी : _वॉटर इनलेट व आऊटलेट पाईप _टेफलॉन टेप  _गॅस पाईप  _होस क्लिप्स _सेल जोडी _स्क्रू व रावळ प्लग (युनिटचे इन्स्टॉलेशन व मेन्टेनन्स तज्ञ व्यक्ती कडून करून घेणे आवश्यक आहे)  -वॉटर प्रेशर अंदाजे ठराव : वॉटर टॅंक व गॅस गिझर यामधील व्हर्टिकल डिस्टन्स _4 ते 20 फुट..लो प्रेशर _20 ते 100 फूट..हाय प्रेशर (या अनुसार लो प्रेशर मॉडेल खरेदी करायचे की हाय प्रेशर ते ठरवू शकता)  -गॅस सप्लाय घ्यायची काळजी _एक्सपायरी डेट न झालेला सिलेंडर (टाकी वर उल्लेख असतो)  _गॅस सिलेंडर एक्झिट नोझल मधील वायसरची तपासणी  _गॅस रेग्युलेटरची अधिकृत कंपनीकडून उपलब्धता  _गॅस पाईपची 5 फुटापर्यंत मर्यादा (यापेक्षा जास्त असल्यास कॉपर पाईप वापरू शकता)  _गॅस गिझर एन्ट्री नोझल मधील वायसरची तपासणी   _गॅस गिझरसाठी "हवेशीर व सुटसुटीत जागा" (हा फार महत्त्वाचा मुद्दा ...