घरगुती आटा चक्की (घरघंटी) कशी वापरावी?
![]() |
| जाहिरात |
-मशिन ठेवण्याची जागा सुटसुटीत व हवेशीर असावी. मशिन वापरताना भिंतीपासून एक - दोन फूट पुढे ओढून घ्यावे. मशिनचा पाण्याशी संपर्क टाळावा. मशिनचा सलग दिर्घकाळ वापर करू नये.
-मशिनला इलेक्ट्रिक सप्लाय देण्यासाठी पॉवर पॉईंटचा वापर करावा.अर्थिंग आवश्यक. मशिन सिंगल फेज सप्लायर चालते . थ्री फेज सप्लायची आवश्यकता नाही.एकाच वेळी घरघंटी सह इलेक्ट्रिक गिझर, पंप, वॉशिंग मशिन अशी उपकरणे एकदम वापरणे टाळावे.
-इलेक्ट्रिक सप्लाय व्होल्टेज कमी जास्त होत असल्यास इलेक्ट्रिक सप्लाय येत जात असल्यास, जोरदार पाऊस व वीजा चमकणे अशा वेळी मशिन तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवावे. अशा वेळी थेट पीन टॉप काढून ठेवणे हितावह.
-शक्यतो आटा चक्कीचा वापर सकाळी 10 ते 6 या वेळे दरम्यान करावा.
-एका वेळी 4 किलो पेक्षा जास्त धान्य दळण्यास लावू नये
-तसेच सलग 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मशिन चालू ठेवू नये (अन्यथा मशिन ओव्हरलोड होऊ शकते)
-नाचणी , वरी ,कणी अशी अति बारिक धान्य वाटीने हळू हळू टाकावी .
-कोणत्याही परिस्तिथतीत जाड पीठ पुन्हा बारीक करण्यासाठी होपर मध्ये टाकू नये .
-इलेक्ट्रिक सप्लाय कट झाल्यास स्विच तातपुरते बंद करावे ,पूर्ववत झाल्यास पुन्हा चालू करावे.
-प्रथम हव्या असलेल्या धान्याची चाळण चेंबरमध्ये तंतोतंत बसवावी व तसेच चेंबरचा दरवाजा व्यवस्थित बंद करावा. पीठ जाड वा बारीक होणे हे चाळणीवर अवलंबून आहे. जितका चाळणीचा नंबर कमी तितके पीठ बारीक. झिरो नंबर चाळण सर्वात बारिक पीठ तर सहा नंबर चाळण भरड साठी वापरतात. बेंड झालेली किंवा आकार बदललेली चाळण वापरल्यास (चाळण गरम असताना हाताळल्यास खराब होऊ शकते) हवे तसे पीठ मिळत नाही. चाळण स्वच्छ करताना ठोकवू नये व वापरात नसताना चाळण उभी ठेवावी.
-मोड निवडण्याची सुविधा असल्यास धान्या अनुसार निवडावा.
-त्यानंतर चेंबरच्या खालील क्लॉथ फिल्टर कंटेनरला व्यवस्थित बसवावा .पीठ कमी जास्त उडणे हे क्लॉथ फिल्टर म्हणजेच कापडावर अवलंबून आहे. कापड धूवू नये, झटकून ठेवावे. फार जुने खराब कापड वापरू नये. कापडाची नाडी वा इलॅस्टिक व्यवस्थित असावे.
-कॅबिनेट दरवाजा उघडा ठेवला तरीही चालेल पण चेंबरचा दरवाजा बंदच ठेवावा.(डोअर स्विच कॅबिनेटला असल्यास मात्र दोन्ही दरवाजे बंद ठेवावे लागतात)
-होपरमध्ये धान्य टाकण्यापूर्वी ते ओलसर तेलकट नसल्याची खात्री करावी, अन्यथा घास लागू शकतो.
-तसेच धान्यामध्ये खडे, स्कू नसल्याची पूर्ण खात्री करावी , अन्यथा बीटर व चाळण खराब होऊ शकते.
-होपरमध्ये धान्य टाकल्यानंतर मेन स्विच चालू करावे व होपरचा दरवाजा बंद करावा.
-मशिन ऑटोमेटीक असल्यामुळे ते आपोआप सुरू होईल . चेंबर मध्ये धान्य दळले जाऊन त्याचे पीठ कंटेनरमध्ये जमा होईल.
-बझर वाजल्यानंतर मेन स्विच बंद करावे.
-धान्य दळून जमा झालेले पीठ क्लॉथ फिल्टर काढून कंटेनर मधून काढून घ्यावे.
-चेंबर व चाळण यांची साफ सफाई ब्रशने करावी . चेंबरची साफ सफाई, चाळण काढणे वा बदलणे इत्यादी कामे चेंबर गरम नसताना करावी, गरम असताना साफसफाई केल्यास क्लिनिंग ब्रश लवकर खराब होतो. एकसारख्या धान्याच्या दळणासाठी (उदाहरणार्थ एकदा गहू दळल्यावर परत गहू दळणे) वारंवार साफ करायची वा चाळण काढ घाल करायची गरज नाही, दोन तीन दळणानंतर साफसफाई करु शकता. "चेंबरची साफसफाई करताना इलेक्ट्रिक सप्लाय बंद असल्याची खात्री कराच" (फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा)
-सर्व धान्याची दळण्याची पद्धत एकसारखी नसते हे लक्षात घ्यावे. सुरूवातीचे काही दिवस थोडे थोडे वेगवेगळे धान्य दळून अंदाज घ्यावा.
दिलेल्या माहितीत मशिनच्या कंपनी व मॉडेल अनुसार बदल आवश्यक असू शकतात.
वॉरंटी/गॅरंटी कार्ड व इन्स्ट्रक्शन मॅन्युअल काळजीपूर्वक वाचावे.
नियम व अटी लागू*

Comments
Post a Comment