एअर कुलर कसा वापरावा?
![]() |
| जाहिरात |
-एअर कुलरसाठी जागा कशी निवडावी ?
एअर कुलर त्याच्या मागील हवा पुढे ढकलत असल्याने शक्यतो एअर कुलर दरवाजा किंवा खिडकीच्या जवळ ठेवावा ,अगदीच असा पर्याय उपलब्ध नसेल तर भिंतीपासून दोन चार फूट पुढे ठेवावा.
-एअर कुलर वापरताना दारे खिडक्या बंद ठेवण्यात का?
अजिबात नाही ,लक्षात घ्या एअर कंडिशनर व एअर कुलर यामध्ये फरक आहे .शक्यतो एअर कुलरच्या मागील बाजूने ताजी हवा आत येईल व विरुध्द बाजूने दूरवरून दुसऱ्या बाजूने हवा बाहेर जाईल असे दोन (ओपनिंग - गोईंग ) स्रोत उपलब्ध असल्यास एअर कुलर जास्त चागले कार्य करू शकतो.
-एअर कुलर कंट्रोल नॉबचे सेटिंग कसे करावे?
एअर कुलरला अर्थिंग सह पॉवर सप्लाय आवश्यक असतो.
_स्पीड नॉब..आतील ब्लेड किंवा ब्लोअर चे स्पीड ठरवतो . गरजेनुसार कमी जास्त करु शकता.
_स्विंग नॉब..बाहेरील उभ्या पट्ट्या फिरत्या हव्यात की स्थिर हे ठरवतो ,सर्व दिशेने की एक दिशेने वारा हवा यानुसार ऑन किंवा ऑफ ठेवू शकता.
_कुल नॉब ..हनिकोंब पॅड किंवा वाळा गवत सुके ठेवायचे की ओले हे ठरवतो. पावसाळा किंवा हिवाळ्यात ऑफ व उन्हाळ्यात ऑन ठेवू शकता . (मात्र अॉन ठेवताना टॅंक मध्ये पाणी असणे आवश्यक आहे)
(आडव्या पट्ट्या मात्र जमिनीवर झोपणार की बेडवर यानुसार दोन्ही हाताने दोन टोके धरून अॅडजस्ट करू शकता, पण वारंवार हाताळणी करु नाही)
-विशेष काळजी कोणती घ्यावी ?
_प्रथम एअर कुलरची जागा निवडून नंतर हळू हळू पाणी भरावे , पाण्याने टॅंक भरलेला असताना एअर कुलर उचलू नये.
_अधे मधे हानिकोंब किंवा वाळा गवत यामधील कचरा, धूळ ,जळकट एअर कुलर बंद असताना स्वच्छ करावा .
_उन्हाळा संपल्यावर पूर्ण पाणी काढून पंप (कुल नॉब) बंद ठेवून एक दोन दिवस एअर कुलर वापरावा, म्हणजे पॅड / गवत वार्याने सुकून जाईल, खराब होणार नाही .
_इतर ऋतूत महिन्यातून किमान दोन चार वेळा एअर कुलर वापरावा (पाणी न भरता, कुल नॉब बंद ठेवून), म्हणजे ब्लोअर किंवा फॅन ची मोटर जाम होणार नाही .
_एअर कुलरचा सलग दिर्घकाळ वापर करू नये.
दिलेल्या माहितीत मशिनच्या कंपनी व मॉडेल अनुसार बदल आवश्यक असू शकतो.
इन्स्ट्रक्शन मॅन्युअल व वॉरंटी/गॅरंटी कार्ड काळजीपूर्वक वाचा.

Comments
Post a Comment