मित्रहो, कोणत्याही इलेक्ट्रिक अप्लायन्सेसला शॉक लागण्याचा धोका असतो का नसतो? यावर ठराविक परिस्थितीत असू शकतो असेच म्हणावे लागेल, इलेक्ट्रिक अप्लायन्सेसचा वापर तर आजच्या काळात अनिवार्य आहे, मग काळजी घेणे हा एकमेव उपाय आहे.
इलेक्ट्रिक गिझर मध्ये नेमके काय असते ते ढोबळ मानाने आधी पाहूया. कॅबिनेट, हिटसिंक वूल, टॅन्क, कॉईल, टेम्परेचर कटअॉफ इत्यादी. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉईल. इत्यादी. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉईल. इत्यादी. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉईल. कॉईल मध्ये *हिट एलिमेंट (जे इलेक्ट्रिक सप्लाय मिळाल्यावर हिट निर्माण करते), *इन्सुलेशन पावडर (जे हिट ट्रान्सफर करते पण इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्सफर होऊ देत नाही), *मेटल ट्युब (जे हिट पुढे म्हणजे पाण्यामध्ये ट्रान्सफर करते म्हणजेच पाणी गरम करते)असे इंटरनल पार्ट्स असतात.
कॉईल सोबत टॅन्क मध्ये *थर्मोस्टट देखील असतात. टॅन्क व कॅबिनेट याचे मधे *हिटसिंक वूल असते.
ज्या टॅन्क मध्ये कॉईल इन्सर्ट केलेली असते तिथून येणाऱ्या पाण्याला शॉक लागू नये, पाणी अति गरम होऊ नये, कॅबिनेटला हात लावल्यास चटका बसू नये अशा प्रकारची रचना 99 टक्के पेक्षा अधिक उत्पादकांनी करणे हे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सहज शक्य आहे व तसेच केलेले असते.
मग शॉक लागण्याची क्वचित कधीतरी घटना कशी घडते? यालाच अपघात म्हणतात, तो कसा उद्भवू शकतो ते पहा..
इलेक्ट्रिक गिझरची कॉईल सतत पाण्याच्या संपर्कात राहून जर त्यातील मेटल ट्युब वर पाण्यातील क्षारांचा थर तयार झाला किंवा गन्ज पकडला किंवा, किंवा अनेक वर्ष वापरामुळे जर कॉईलला छोटेसे जरी छिद्र पडले तर कुठेतरी मेटल ट्युब लिक होऊन पाणी इन्सुलेशन पावडरच्या संपर्कात येते व त्या भागातील इन्सुलेशन पावडर हळूहळू पाण्यामध्ये मिक्स होऊन वाहून जाते, परिणामी हिट एलिमेंट मधील हिट बरोबर इलेक्ट्रिक सप्लाय देखील थेट मेटल ट्युब व पुढे पाण्याला मिळाला तर शॉक लागण्याची शक्यता असते.
या वेळी अशा ठिकाणी जर अर्थिन्ग प्रॉपर असेल व योग्य क्षमतेची एमसीबी+ईएलसीबी व्यवस्थित कार्यरत असेल तर संभाव्य मोठा धोका टळू शकतो किंवा कमी होऊ शकतो.
.. वाहन असो वा उपकरण, अपघात होईल या भीतीने वापर टाळण्या पेक्षा (अशा किती वस्तूंचा वापर टाळणार?) अपघात होऊ नये म्हणून काळजी घेणे जास्त योग्य! बरोबर ना?
इलेक्ट्रिक गिझर वापरताना कोणती काळजी घ्यावी यातील काही मुद्दे
*-इलेक्ट्रिक गिझरला सप्लाय देण्यासाठी किमान अडिच एम एम स्क्वेअर वायरचा व सोळा अॅम्पिअर बोर्डाचा वापर करणे
-शक्यतो मीटर ते योग्य क्षमतेची एमसीबी+ईएलसीबी ते गिझर असे कनेक्शन व सोबत प्रॉपर अर्थिन्ग फार महत्वाचे.
-पाणी पुरवठा सुरळीत असल्याची खात्री करून नंतरच पॉवर अॉन करणे
-वातावरणा अनुसार (उन्हाळा, पावसाळा, हिवाळा) पाण्याचा फ्लो कमी जास्त ठेवणे. (फ्लो जास्त ठेवला - तर - कमी गरम होणार)
-ठराविक कालावधीनंतर उपकरणाची तपासणी वा सर्व्हिसिंग करून घेणे (पाण्याचा टिडीएस अति असेल तर(विशेष करून बोअरवेलचे पाणी वापरत असाल तर), सदर कालावधी कमी असणार आहे)
-कधीही काही शंका असल्यास उपकरण तात्पुरते बंद ठेवून जाणकार इलेक्ट्रिशियनचा सल्ला घेणे
तसेच
*-कंपनी व मॉडेल अनुसार आणखी काही सूचना आहेत का यासाठी इन्स्ट्रक्शन मॅन्युअल समजून घेणे.
आणि
अगदीच अति काळजी घ्यायची असेल तर
*-शक्यतो मेटल ऐवजी चांगल्या दर्जाचे पीव्हीसी पाईप, टॅप व बकेट, मग वापरणे.
-गिझर सुरू असताना पाण्याच्या धारेला किंवा बादलीतील पाण्याला हात लावणे टाळावे.
तसे पाहता प्रॉपर अर्थिन्ग व योग्य क्षमतेची एमसीबी+ ईएलसीबी असेल तर फार घाबरण्याचे कारण नाही, दुर्दैवी अपवादात्मक घटना वगळता.
क्वचित कधीतरी होणाऱ्या अपघाताला उपकरणे वा उत्पादक याऐवजी बर्याच वेळा अज्ञान, दुर्लक्ष, बेफिकीरी, संलग्न इतर गोष्टी जास्त जबाबदार असाव्यात बहुधा.
खर तर इलेक्ट्रिक गिझर हे एक सुंदर उपकरण आहे, आमच्या सह अनेक डिलर विविध कंपन्यांचे इलेक्ट्रिक गिझर विक्री करतात, एकत्रित ग्राहकांची संख्या हजारो आहे, अनेक वर्षे हे उपकरण बाजारपेठेत व घराघरांत आहे. इलेक्ट्रिक गिझर ज्यांचे कडे पूर्वी पासून आहे किंवा जे नवीन घेण्याचा विचार करत आहेत त्या सर्वांनी प्रॉपर अर्थिन्ग व योग्य क्षमतेची एमसीबी+ईएलसीबी असल्याची खात्री करून घ्यावी असे आवाहन करून इथेच थांबूया.
Comments
Post a Comment