कितीही असली मंदी
तरीही आम्ही आहोत स्वच्छंदी
काल विक्री केली गॅस शेगडी
उद्या विक्री करणार घरघंटी
कितीही स्लो झाला बाजार
आम्हास नसे तो आजार
आज बसवला गॅस गिझर
परवा बसवणार वॉटर प्युरिफायर
हंगामी व फिरते चुना लावणार
फसल्यावर अक्कल येणार
मस्तच आमुचा मिक्सर ग्राईंडर
उपलब्ध आहे इलेक्ट्रिक कुकर
कित्ती आले गेले अॉन लाईन
आम्हीच इथली लाईफ लाईन
इलेक्ट्रिक गिझर आमची शान
लहान मोठा इन्व्हर्टर देखील छान
जरी नसला सिझन
ग्राहकांसी नाही लागत रिझन
कधी कोणी घेतो इंडक्शन
कधी कोणी घेतो कुलर फॅन
बरेचसे झाले फ्लॉप
आम्ही ठरलो टॉप
कोणी आहे का विचारतो इझी मॉप
कोणी आहे का विचारतो वॉटर फिल्टर टेबल टॉप
नाही आमुच्या कडे उधारी वा फायनान्स
पण आहे दर्जा व गुणवत्तेचे लायसन्स
जरी नियमावली आमुची खाष्ट
तरी जाणतो आम्ही ग्राहक हिताची गोष्ट
गरज लागता नका होऊ नर्व्हस
अगदी तत्पर आमुची सर्व्हिस
अप्लायन्सेसचे बीट हार्ट
म्हणजेच स्पेअर पार्ट
असू आम्ही बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स
छंद विक्री करणे अप्लायन्सेस
व्यापारच इथली वहिवाट
ग्राहकच करीती आमुची जाहिरात
आम्हास नसती कोणी विरोधक
जे आहेत ते फक्त सौम्य स्पर्धक
कायम हजर आमुचा स्टॉक
फक्त बुधवारी अॉफीस लॉक
Comments
Post a Comment