Skip to main content

AccuMan® कोकणचा ब्रॅन्ड ॲक्युमन

नमस्कार,मी सुखानंद कुलकर्णी  (बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स),  प्रोप्रायटर मनिष सोल्युशन्स  (गृहोपयोगी वस्तूंचे दालन),  तसेच AccuMan या रजिस्टर्ड ट्रेडमार्कचा ओनर.  गेली अनेक वर्षे गृहोपयोगी वस्तू विक्री करत व सेवा पुरवत असताना , नेमक्या कोणत्या गोष्टी विक्रेत्यांना व ग्राहकांना माहिती असायला हव्यात याचा चांगलाच अंदाज आला व त्या अनुषंगाने एक उपयुक्त संकलन तयार करायचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करत आहे.  आपणांस सदर माहिती आवडल्यास नक्कीच कमेंट, लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.  अधिक माहिती साठी संपर्क संपर्काची वेळ : सकाळी नऊ ते सायंकाळी सात (भारतीय प्रमाणवेळेनुसार) मनिष सोल्युशन्स डॉ. पत्की दवाखान्याचे मागे,  टि. बी. चाळीचे जवळ,  लांजा 416701 , जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र, इंडिया 9970593910 किंवा 9404763509 sukhanandkulkarnilanja@gmail.com manishsolutionslanja@gmail.com

वॉटर प्युरिफायर - समज, गैरसमज accuman water purifier lanja

वॉटर प्युरिफायर संदर्भात आजकाल वर्तमानपत्रात, टि.व्ही.वर,नेटवर अनेक जाहिराती दिसत आहेत. तसेच वॉटर प्युरिफायरचे समर्थन करणार्‍या बातम्या व विरोध करणाऱ्या बातम्या सुद्धा आढळत आहेत. सामान्य माणसाला संभ्रम निर्माण होईल असे वातावरण दिसत आहे. म्हणूनच काहीतरी लिहावे असे वाटले. खरं तर बहुतांशी आजार हे अशुद्ध पाणी पिण्यामूळेच होतात हे खरे आहे. पण पाणी शुद्ध करताना त्यातील अशुद्धतेबरोबर आवश्यक घटक नष्ट होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी.

आजकाल आर. ओ. वॉटर प्युरिफायरचे फॅड आले आहे. पण आर. ओ. म्हणजे नेमके काय हे ग्राहकाला सोडाच, पण विक्रेत्यालाही धड सांगता येत नाही. जिथे अति खोल बोअरवेलच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जातो, फक्त तिथेच आर. ओ. वॉटर प्युरिफायरची आवश्यकता असते. अशा पाण्यामध्ये एकूण विरघळलेल्या क्षारांचे (TDS) प्रमाण अतिरिक्त असल्यास ते योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी आर. ओ. वॉटर प्युरिफायरचा उपयोग केला जाऊ शकतो.काही सेटिंग्ज त्यामध्ये असतात त्या योग्य रितीने हाताळणे देखील आवश्यक आहे. आर. ओ. म्हणजे रिव्हर्स अॉसमॉसिस. यामध्ये उपलब्ध पाण्यातील क्षार कमी करण्याची सोय असते. पण मूळातच जर तुम्ही कमी खोल विहिरीचे किंवा नदीचे पाणी पिण्यासाठी वापरत असाल तर त्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी असते. असे पाणी शुद्ध करण्यासाठी आर. ओ. वॉटर प्युरिफायरचा वापर केल्यास कमी असलेल्या क्षारांचे प्रमाण आणखीनच म्हणजे आवश्यकतेपेक्षा सुद्धा कमी होते,हे आरोग्यदायी ठरत नाही. जिथे मूळातच पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी आहे तिथे शुद्धीकरणासाठी यु. व्ही. (अल्ट्रा व्हॉयलेट) किंवा यु. एफ. (अल्ट्रा फिल्टर) वॉटर प्युरिफायर वापरणे योग्य ठरते. हे प्रकार पाण्यातील क्षारांचे प्रमाण कायम ठेवून शुद्धीकरण करतात. क्वचित काही ठिकाणी अगदी बोअरवेलच्या पाण्यामध्ये देखील क्षारांचे प्रमाण मध्यम आढळते, तिथे देखील यु. व्ही. आणि यु. एफ. वॉटर प्युरिफायरचा उपयोग शुद्धीकरणासाठी केला जाऊ शकतो.


आपण आपल्या कडील उपलब्ध पाण्यातील क्षारांचे प्रमाण TDS METER द्वारे तपासून घेऊ शकतो. बर्‍याच ठिकाणी हे उपकरण उपलब्ध आहे. व या तपासणी नंतर नक्की कोणता वॉटर प्युरिफायर घ्यायचा हे ठरवू शकतो. थोडक्यात वॉटर प्युरिफायरचा वापर धोकादायक असूच शकत नाही, मात्र वॉटर प्युरिफायरची आवश्यकतेनुसार योग्य निवड करणे महत्त्वाचे आहे. चुकीची निवड आरोग्यास अपायकारक ठरू शकते. 

टिप:

सध्या आपल्या कोकणातल्या लांज्यासारख्या तालुक्यात (जिथे औद्योगिकीकरणामूळे होणारे जलप्रदूषण फारसे नाही तसेच समुद्र देखील फार जवळ नाही, आणि सुदैवाने क्षारांचे प्रमाण देखील काही अपवाद वगळता अतिरिक्त नाही) नक्कीच बहुतांश ठिकाणी आर. ओ. ऐवजी यु. व्ही. किंवा यु. एफ. वॉटर प्युरिफायरचा वापर करणे हितावह आहे. आर.ओ.पेक्षा यु. व्ही.चा व यु. व्ही. पेक्षा यु. एफ. चा देखभाल खर्च तुलनेने कमी येतो.

Comments

Popular posts from this blog

घरगुती आटा चक्की कशी वापरावी

 घरगुती आटा चक्की (घरघंटी) कशी वापरावी?  जाहिरात -मशिन ठेवण्याची जागा सुटसुटीत व हवेशीर असावी. मशिन वापरताना भिंतीपासून एक - दोन फूट पुढे ओढून घ्यावे. मशिनचा पाण्याशी संपर्क टाळावा. मशिनचा सलग दिर्घकाळ वापर करू नये.  -मशिनला इलेक्ट्रिक सप्लाय देण्यासाठी पॉवर पॉईंटचा वापर करावा.अर्थिंग आवश्यक. मशिन सिंगल फेज सप्लायर चालते . थ्री फेज सप्लायची आवश्यकता नाही.एकाच वेळी घरघंटी सह इलेक्ट्रिक गिझर, पंप, वॉशिंग मशिन अशी उपकरणे एकदम वापरणे टाळावे.  -इलेक्ट्रिक सप्लाय व्होल्टेज कमी जास्त होत असल्यास इलेक्ट्रिक सप्लाय येत जात असल्यास, जोरदार पाऊस व वीजा चमकणे अशा वेळी मशिन तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवावे. अशा वेळी थेट पीन टॉप काढून ठेवणे हितावह.  -शक्यतो आटा चक्कीचा वापर सकाळी 10 ते 6 या वेळे दरम्यान करावा.  -एका वेळी 4 किलो पेक्षा जास्त धान्य दळण्यास लावू नये -तसेच सलग 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मशिन चालू ठेवू नये (अन्यथा मशिन ओव्हरलोड होऊ शकते)  -नाचणी , वरी ,कणी अशी अति बारिक धान्य वाटीने हळू हळू टाकावी . -कोणत्याही परिस्तिथतीत जाड पीठ पुन्हा बारीक करण्यासाठी ह...

वॉटर प्युरिफायर कसा वापरावा

 वॉटर प्युरिफायर कसा वापरावा? जाहिरात  -वॉटर प्युरिफायरचे अनेक प्रकार  उपलब्धत आहेत A=RO+UV     B=RO+UF C=RO+UV+UF D=only UV E=only UF F=UV+UF  -वॉटर प्युरिफायरची निवड - ओव्हरहेड टॅंकमधील  पाण्याचा T.D.S तपासून घेणे. बोअरवेलच्या   हाय  T.D.S  पाण्यासाठी A, B,C यापैकी एक  तर  विहिर /नदीच्या लो T.D.S पाण्यासाठी D,E,F यापैकी एक प्रकार निवडणे योग्य ठरते. साधारणतः T.D.S. 200ppm पेक्षा कमी प्रमाण असेल तर लो मानला जातो व 200ppm पेक्षा जास्त प्रमाण असेल तर हाय मानला जातो. या तपासणी अनुसार योग्य मॉडेल निवडावे.  वॉटर प्युरिफायरच्या  विविध कॅन्डल्स व त्यांची पाण्या संदर्भातील कार्ये - _प्री फिल्टर - दृश्य घटक  व गढूळपणा दूर करणे (अंदाजे कार्यकाल 06 महिने)  _सेडिमेंट फिल्टर - सूक्ष्म दृश्य घटक दूर करणे(अंदाजे कार्यकाल  12 महिने)  _कार्बन फिल्टर - क्लोरीन कमी  करणे व चव, वास सुधारणे (अंदाजे कार्यकाल  12 महिने)  _आर ओ मेंब्रेन - अतिरिक्त अनावश्यक जडत्व दूर करणे (अंदाजे  कार्यकाल...

घरघंटी - सामान्य प्रश्न व उत्तरे accuman atta chakki lanja

घरगुती आटा चक्की संदर्भातील ग्राहकांकडून विचारले जाणारे प्रश्न व त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न : "घरघंटी म्हणजे घरगुती आटा चक्की" (Domestic flour mill)  घरगुती वापरासाठी किती ताकदीची घरघंटी खरेदी करावी? सर्वसाधारणपणे एक एचपी (अश्वशक्ती) ची घरघंटी घ्यायला हरकत नाही. एक एचपी घरघंटी गृहीत धरून यापुढील प्रश्नांची उत्तरे देत आहे.  घरघंटीत किती किलो धान्य दळून होते? एका वेळी चार ते पाच किलो क्षमता व प्रति तास आठ ते दहा किलो वेग.  प्रति किलो धान्य दळण्याचा वीजेचा खर्च किती? एक रुपयांहून कमी.  (सव्वा तास घरघंटीचा वापर झाल्यास अंदाजे एक युनिट, सव्वा तासांत कमीत कमी दहा किलो धान्य व युनिटचा दर पाच रुपये गृहीत धरल्यास.) घरघंटीवर दररोज किती धान्य दळता येईल? चाळीस किलो वगैरे.  विद्युतदाब सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत योग्य असायची शक्यता, या आठ तासांत अर्धा तास चालू व अर्धा तास बंद याप्रमाणे) घरघंटी कोणत्या कंपनीची खरेदी करावी? सध्या मार्केट मध्ये ब्रॅन्डेड- नॉन ब्रॅन्डेड अशा अनेक घरघंटी उपलब्ध आहेत,  पन्नास शंभर नावं आढळतील. त्यामुळे स्थानिक पातळीवरील जाणकार व व...