मिक्सर ग्राईंडर कसा वापरावा ?
![]() |
| जाहिरात |
-मशिन ठेवण्याची जागा सुटसुटीत असावी.कागद किंवा कापडावर मशिन ठेवू नये.
-मशिनला सप्लाय देणारा पॉवर पॉईंट अर्थिंग सह असावा.
-मशिनलासप्लाय देणारी मेन कॉर्ड दुमडून ठेवू नये.
-मशिनला सप्लाय देण्यापूर्वी मशिन व जार दोन्हींचे कपलर सहजपणे फिरत असल्याची खात्री करणे .
-जार मध्ये अर्ध्यापेक्षा कमी पदार्थ भरून लिड बंद करणे.
-जार मशिनमध्ये योग्य पद्धतीत बसवणे व लिडवर हात ठेवणे
इत्यादी गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
-मशिनला सप्लाय दिल्यानंतर
-रोटरी स्विच घड्याळाच्या दिशेने फिरवून मशिन चालू होते . व रोटरी स्विच घड्याळाच्या विरूद्ध दिशेने फिरवून मशिन बंद होते.
-चालू करताना 1,2,3 व बंद करताना 3,2,1 असा क्रम असतो . या पद्धतीने मशिन हताळणे .
-जार पूर्णत: गच्च भरण्या ऐवजी त्यामध्ये थोडे थोडेच पदार्थ भरणे, म्हणजे पदार्थ जार मध्ये फिरण्यासाठी पुरेशी जागा मिळते .
-मशिनचा सलग वापर करण्या ऐवजी थोडा वेळ चालू व थोडा वेळ बंद करणे म्हणजे मशिन ओव्हरलोड होत नाही.
-लिक्विडायझिंग जारचा ( सामान्यत: फुलाच्या आकाराचे ब्लेड असणारा सर्वात मोठा जार) वापर पातळ पदार्थांसाठी करणे.
-ग्राईंडिंग जारचा (सामान्यत: अधिक चिन्हाच्या आकाराचे ब्लेड असणारा मध्यम जार) वापर सुका /ओला मसाला पदार्थांसाठी करणे .
-चटणी जारचा (सामान्यत: छोटे ब्लेड असणारा छोटा जार) वापर चटणी वगैरे पदार्थासाठी करणे.
-सर्व जार वापर झाल्यानंतर घासून व पुसून स्वच्छ आणि कोरडे करून ठेवावेत .
-मशिन कोरड्या /ओल्या कापडाने पुसवे, परंतू मशिनमध्ये पाणी जाऊ नये.
-मशिन ओव्हरलोड झाल्यास थोडा वेळ थांबून (पाच ते दहा मिनिटे) मशिनच्या खालच्या साईडला असणारे ओव्हरलोड स्विच एकदा,दोनदा काही सेकंद (दोन तीन) दाबून धरून मशिन रिसेट करण्याचा प्रयत्न करून बघता येऊ शकतो. (असे न झाल्यास तांत्रिका कडून तपासणी करून घेणे आवश्यक असते)
-मशिनचा सलग दिर्घकाळ वापर टाळावा.
दिलेल्या माहितीत मशिनच्या कंपनी व मॉडेल अनुसार बदल आवश्यक असू शकतो.
वॉरंटी कार्ड व इन्स्ट्रक्शन मॅन्युअल काळजीपूर्वक वाचा.
नियम व अटी लागू*

Comments
Post a Comment