इन्व्हर्टर व बॅटरी कशी वापरावी
![]() |
| जाहिरात |
-आपणास एका वेळी जास्तीत जास्त किती लोड ( किती टयुब, फॅन,इतर गोष्टी किती वटेजच्या ) चालवयचा आहे (इन्व्हर्टर व्दारे) या गरज व मागणी नुसार इन्व्हर्टर निवडला जातो.
-आपणास सदर ठरविक लोड सलग किती तास (अंदाजे दोन,तीन,चार तास ) चालवायचा आहे (बॅटरीव्दारे) या गरज व मागणीनुसार बॅटरी निवडली जाते.
-ढोबळमानाने अंदाज
_इन्व्हर्टर700VA व
बॅटरी150Ah
जास्तीत जास्त लोड एका वेळी 3ट्युब, 3 फॅन, 6 एलईडी बल्ब, मोबाईल चार्जर इत्यादी
अंदाजे बॅक अप सलग 3 तास
_इन्व्हर्टर:- 900VA व
बॅटरी 190Ah
जास्तीत जास्त लोड एका वेळी
4 ट्युब , 4फॅन, 8 एलईडी बल्ब , मोबाईल चार्जर इत्यादी
अंदाजे बॅक अप सलग 3 तास
_इन्व्हर्टर 1100VA व
बॅटरी 230Ah
जास्तीत जास्त लोड एका वेळी 5 ट्युब, 5 फॅन, 8 एलईडी बल्ब, मोबाईल चार्जर इत्यादी
अंदाजे बॅक अप सलग 3 तास
(एकूण वॅटेज मर्यादा न ओलांडता त्याच कॅपॅसिटीचा वेगळा लोड जोडता येऊ शकतो)
-वायरिंग पद्धत
मीटर ते इन्व्हर्टर व बॅटरी ते ठराविक ट्यूब ,फॅन ,एलईडी बल्ब, मोबाईल चार्जर सॉकेट (न्यूट्रल कॉमन ठेवून फेजसाठी इन्व्हर्टर सेरीज मध्ये येतो, सामान्यतः सदर काम इलेक्ट्रिशियन कडून करून घ्यावे लागते)
_लोड जास्त झाल्यास इलेक्ट्रिक सप्लाय नसताना व असताना देखील इन्व्हर्टर overload होऊ शकतो.
_इलेक्ट्रिक सप्लाय नसताना आवश्यक तेवढ्याच ट्यूब, फॅन , एलईडी बल्ब, मोबाईल चार्जर यांचा वापर करावा. जोडलेल्या सर्वच गोष्टींचा एकाच वेळी सलग दीर्घकाळ वापर केल्यास बॅटरी low होऊ शकते.
_इलेक्ट्रिक सप्लाय सतत येत जात असल्यास व व्होल्टेज कमी जास्त होत असल्यास, जोरदार पाऊस व वीजा चमकत असल्यास इन्व्हर्टर व्दारे बॅटरी चार्जिंग करू नये , थोडक्यात चार्जिंग त्या थोड्या वेळासाठी बंद करावे, थोड्या वेळाने अनियमितता गेल्यावर चार्जिंग पुन्हा न विसरता चालू करावे. चार्जिंग चालू बंद करण्यासाठी डबल पोल एमसीबीचा वापर करणे जास्त चांगले.
-जोडणी पद्धत
_इन्व्हर्टरला प्रथम बॅटरी जोडणे आवश्यक आहे.(काळी वायर निगेटिव्ह व लाल वायर पॉझिटिव्ह) तसेच सदर बॅटरी डिस्टिल्ड वॉटर टॉप अप केलेली असावी. बॅटरी टर्मिनलचा वातावरणाशी संपर्क कमी व्हावा म्हणून जेली लावावी. त्यानंतरच इन्व्हर्टरला इलेक्ट्रिक सप्लाय जोडणे शक्य आहे . त्यानंतर इन्व्हर्टरला लोड जोडू शकता व इन्व्हर्टर वरील स्विच व पॉवर पॉईंट अॉन करू शकता. (पॉवर पॉईंटला अर्थिंग आवश्यक)
_इन्व्हर्टर डिस्प्ले पॅनलवर असणारे चिन्ह संकेत व त्यांचा अर्थ पुढील प्रमाणे
mains on म्हणजे इलेक्ट्रिक सप्लाय चालू आहे.
charging on म्हणजे बॅटरी चार्जिंग चालू आहे.
ups on म्हणजे इलेक्ट्रिक सप्लाय बंद आहे, बॅटरी बॅकअप मिळत आहे.
over load म्हणजे जास्तीत जास्त लोडची मर्यादा ओलांडली आहे.
_battery low :- म्हणजे बॅटरी बॅकअप संपला आहे .
_fuse blown :- म्हणजे फ्युज खराब झाली आहे .
-इन्व्हर्टरमध्ये बिघाड झाल्यास तात्पुरता बायपास
_पॉवर पॉइंट व मशिन वरील (दोन्ही) बटणे बंद करणे.
_पॉवर पॉईंट मधून इन्व्हर्टर चार्जिंग करणारा पीन टॉप (मेटल कनेक्टरना स्पर्श टाळून, फक्त प्लास्टिक हेड धरून) एखाद्या प्लास्टिकच्या बरणीत काढून ठेवावा.
_याच पद्धतीने इन्व्हर्टरच्या आऊटपुट सॉकेट मधील पीन टॉप काढून थेट पॉवर पॉईंट मध्ये बसवावा व फक्त पॉवर पॉईंट वरील बटण चालू करावे.
इन्व्हर्टर दुरुस्ती होईपर्यंत असे करु शकता, दुरूस्ती झाल्यावर पूर्ववत जोडणी करता येईल.
अशी कामे करताना लाकडी स्टूल / खुर्ची, रबरी स्लीपर व ग्लोव्ह्ज इत्यादीचा वापर करु शकता, जेणेकरून शॉक लागणार नाही.
-दर तीन - चार महिन्यांनी इन्व्हर्टर व बॅटरी संदर्भात करायची तपासणी म्हणजे चार्जिंग व्होल्टेज , डिस्टिल्ड वॉटर लेव्हल , बॅक अप व्होल्टेज व स्टॅंडिंग व्होल्टेज , ग्रॅव्हिटी लेव्हल इत्यादी . सामान्यत: सदर काम देखील इन्व्हर्टर व बॅटरी तांत्रिकाकडून करून घ्यावे लागते.
-इन्व्हर्टर बॅटरी ची जोडणी वा तपासणी, वायरिंग, तात्पुरता बायपास करण्याकरीता तज्ञ व जाणकार व्यक्तीलाच प्राधान्य द्यावे.
दिलेल्या माहितीत मशिनच्या कंपनी व मॉडेल अनुसार बदल आवश्यक असू शकतात.
वॉरंटी/गॅरंटी कार्ड व इन्स्ट्रक्शन मॅन्युअल काळजीपूर्वक वाचा.
नियम व अटी लागू*

Comments
Post a Comment