नमस्कार,मी सुखानंद कुलकर्णी (बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स), प्रोप्रायटर मनिष सोल्युशन्स (गृहोपयोगी वस्तूंचे दालन), तसेच AccuMan या रजिस्टर्ड ट्रेडमार्कचा ओनर. गेली अनेक वर्षे गृहोपयोगी वस्तू विक्री करत व सेवा पुरवत असताना , नेमक्या कोणत्या गोष्टी विक्रेत्यांना व ग्राहकांना माहिती असायला हव्यात याचा चांगलाच अंदाज आला व त्या अनुषंगाने एक उपयुक्त संकलन तयार करायचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करत आहे. आपणांस सदर माहिती आवडल्यास नक्कीच कमेंट, लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. अधिक माहिती साठी संपर्क संपर्काची वेळ : सकाळी नऊ ते सायंकाळी सात (भारतीय प्रमाणवेळेनुसार) मनिष सोल्युशन्स डॉ. पत्की दवाखान्याचे मागे, टि. बी. चाळीचे जवळ, लांजा 416701 , जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र, इंडिया 9970593910 किंवा 9404763509 sukhanandkulkarnilanja@gmail.com manishsolutionslanja@gmail.com
एअर कुलर कसा वापरावा? जाहिरात -एअर कुलरसाठी जागा कशी निवडावी ? एअर कुलर त्याच्या मागील हवा पुढे ढकलत असल्याने शक्यतो एअर कुलर दरवाजा किंवा खिडकीच्या जवळ ठेवावा ,अगदीच असा पर्याय उपलब्ध नसेल तर भिंतीपासून दोन चार फूट पुढे ठेवावा. -एअर कुलर वापरताना दारे खिडक्या बंद ठेवण्यात का? अजिबात नाही ,लक्षात घ्या एअर कंडिशनर व एअर कुलर यामध्ये फरक आहे .शक्यतो एअर कुलरच्या मागील बाजूने ताजी हवा आत येईल व विरुध्द बाजूने दूरवरून दुसऱ्या बाजूने हवा बाहेर जाईल असे दोन (ओपनिंग - गोईंग ) स्रोत उपलब्ध असल्यास एअर कुलर जास्त चागले कार्य करू शकतो. -एअर कुलर कंट्रोल नॉबचे सेटिंग कसे करावे? एअर कुलरला अर्थिंग सह पॉवर सप्लाय आवश्यक असतो. _स्पीड नॉब..आतील ब्लेड किंवा ब्लोअर चे स्पीड ठरवतो . गरजेनुसार कमी जास्त करु शकता. _स्विंग नॉब..बाहेरील उभ्या पट्ट्या फिरत्या हव्यात की स्थिर हे ठरवतो ,सर्व दिशेने की एक दिशेने वारा हवा यानुसार ऑन किंवा ऑफ ठेवू शकता. _कुल नॉब ..हनिकोंब पॅड किंवा वाळा गवत सुके ठेवायचे की ओले हे ठरवतो. पावसाळा किंवा हिवाळ्यात ऑफ व उन्हाळ...