नमस्कार,मी सुखानंद कुलकर्णी (बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स), प्रोप्रायटर मनिष सोल्युशन्स (गृहोपयोगी वस्तूंचे दालन), तसेच AccuMan या रजिस्टर्ड ट्रेडमार्कचा ओनर. गेली अनेक वर्षे गृहोपयोगी वस्तू विक्री करत व सेवा पुरवत असताना , नेमक्या कोणत्या गोष्टी विक्रेत्यांना व ग्राहकांना माहिती असायला हव्यात याचा चांगलाच अंदाज आला व त्या अनुषंगाने एक उपयुक्त संकलन तयार करायचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करत आहे. आपणांस सदर माहिती आवडल्यास नक्कीच कमेंट, लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. अधिक माहिती साठी संपर्क संपर्काची वेळ : सकाळी नऊ ते सायंकाळी सात (भारतीय प्रमाणवेळेनुसार) मनिष सोल्युशन्स डॉ. पत्की दवाखान्याचे मागे, टि. बी. चाळीचे जवळ, लांजा 416701 , जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र, इंडिया 9970593910 किंवा 9404763509 sukhanandkulkarnilanja@gmail.com manishsolutionslanja@gmail.com
उद्योग - व्यवसाय, काल व आज असे म्हणतात की "चेंज इज कॉन्स्टंट इन दी वर्ल्ड ॲन्ड कॉन्स्टंट इज चेंजिंग इन दी वर्ल्ड" (change is constant in the world & constant is changing in the world), आणि उद्योग व्यवसायाच्या विश्वात ही म्हण तंतोतंत लागू पडते, म्हणजे थोडंसं व्यत्यास स्वरुपात बदल हा सतत होत होता, होत आहे, होत रहाणार असे म्हणता येईल. थोडंसं आमच्या लहानपणीच्या काळाचे दशक (1992 ते 2001) व सध्या पार पडलेले दशक (2015 ते 2024) याची तुलना उद्योग व्यवसायाच्या बाबतीत केली तर बदल हा अमुलाग्र झालेला दिसतो, जणू काही क्रांतिकारकच. याला कारण म्हणजे संदेश व दळणवळणाची वाढलेली साधने. संदेश म्हणजे कम्युनिकेशन, विक्रेता व ग्राहक मधील यामधील कम्युनिकेशन. पहा पूर्वी विक्रेते दुकानासमोर पाट्या लावणे, वर्तमानपत्रात जाहिराती देणे, एखादे हॅन्डबिल सोडणे, अनाउन्समेंट करणारी रिक्षा फिरवणे याच माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचत होते . वस्तू पहाण्यासाठी दुकानाला प्रत्यक्ष भेट देणे हा एकमेव पर्याय ग्राहकांसमोर होता. पण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्स ॲप वर वस्तूंच्या फोटोचे स्टेटस ठेवणे किंव...