इझी मॉप कसा वापरावा
(नॉन इलेक्ट्रिक बकेट / स्पिन / इझी मॉप)
![]() |
| जाहिरात |
-मशिन मधील बकेटमध्ये अर्ध्या पर्यंतच पाणी भरावे . पूर्ण पाणी भरल्यास स्पिन व्यवस्थित होणार नाही .
-सुरुवातीला मॉप (कॉईन टाईप स्पंज) डिस्कला जोडून डिस्क स्टिकला जोडावी. स्टिकच्या सेंटरला लॉक- अनलॉक ही पट्टी किंवा फिरकी असते. डिस्क व स्टिक याला एकत्रित अॅंगल देता येतो किंवा सरळ रेषेत ठेवता येते.
-स्टिक अनलॉक करुन , स्टिक व डिस्क सरळ रेषेत करून बकेट मधील पाण्याने मॉप भिजावून घ्यावा.उभ्या दिशेने अनलॉक स्टिक , सरळ रेषेत असलेली स्टिक व डिस्क बकेट मध्ये अलगद दाबल्यास मॉप पाण्यामध्ये फिरतो व भिजतो.
-त्यानंतर स्टिक स्पिनमध्ये (बकेट मध्येच एका बाजूला व्हिल असते) त्याच पद्धतीने फिरवावी, म्हणजे अतिरिक्त पाणी निघून जाईल, असे दोन चार वेळा करावे
-त्यानंतर स्टिक लॉक करून , स्टिक व डिस्कला थोडासा अँगल देऊन ती फरशी पुसण्यासाठी वापरावी.
-फरशी पुसून झाल्यावर स्टिक व डिस्कला पुन्हा सरळ रेषेत करून , स्टिक अनलॉक करून बकेट व स्पिनमध्ये वापरावी.
-लक्षात घ्या बकेट वा स्पिनमध्ये वापरण्यासाठी स्टिक अनलॉक आणि स्टिक व डिस्क सरळ रेषेत हवी
व
फरशी पुसताना स्टिक लॉक आणि स्टिक व डिस्क अॅंगल दिलेली हवी .
-वापर झाल्यानंतर डिस्क स्टिक मधून व मॉप डिस्क मधून काढून ठेवयला हरकत नाही.
-तसेच मॉप धुऊन वाळवून ठेवणे गरजेचे आहे.
दिलेल्या माहितीत मशिनच्या कंपनी व मॉडेल अनुसार बदल आवश्यक असू शकतात.
इन्स्ट्रक्शन मॅन्युअल काळजीपूर्वक वाचावे.
नियम व अटी लागू*
.webp)
Comments
Post a Comment