Skip to main content

Posts

Showing posts from 2024

AccuMan® कोकणचा ब्रॅन्ड ॲक्युमन

नमस्कार,मी सुखानंद कुलकर्णी  (बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स),  प्रोप्रायटर मनिष सोल्युशन्स  (गृहोपयोगी वस्तूंचे दालन),  तसेच AccuMan या रजिस्टर्ड ट्रेडमार्कचा ओनर.  गेली अनेक वर्षे गृहोपयोगी वस्तू विक्री करत व सेवा पुरवत असताना , नेमक्या कोणत्या गोष्टी विक्रेत्यांना व ग्राहकांना माहिती असायला हव्यात याचा चांगलाच अंदाज आला व त्या अनुषंगाने एक उपयुक्त संकलन तयार करायचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करत आहे.  आपणांस सदर माहिती आवडल्यास नक्कीच कमेंट, लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.  अधिक माहिती साठी संपर्क संपर्काची वेळ : सकाळी नऊ ते सायंकाळी सात (भारतीय प्रमाणवेळेनुसार) मनिष सोल्युशन्स डॉ. पत्की दवाखान्याचे मागे,  टि. बी. चाळीचे जवळ,  लांजा 416701 , जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र, इंडिया 9970593910 किंवा 9404763509 sukhanandkulkarnilanja@gmail.com manishsolutionslanja@gmail.com

अॉनलाईन व स्थानिक दर

  खरेदी करताय? स्थानिक ठिकाणी की अॉनलाईन? नक्की वाचा *एकसारख्या दिसणाऱ्या / एकसारख्या असणाऱ्या  वस्तूंच्या दरात गावातील व्यावसायिक व अॉनलाईन व्यावसायिक यांच्या कडे  फरक का हे ग्राहक वर्गाने जाणून घ्यावे. काही ठराविक वस्तूंचा अॉनलाईन दर स्थानिक दरापेक्षा अधिक असतो , मूळ किंमतीच्या मानाने अॉनलाईन रेफरल, क्लोजिंग, शिपिंग, अदर फी जास्त होत असते या केसेस मध्ये. व उर्वरित वस्तूंचा अॉनलाईन दर स्थानिक दरापेक्षा थोडा कमी असतो , याचे कारण व्यवसायाची रनिंग कॉस्ट व खरेदी स्किम यात तफावत होत असते या केसेस मध्ये. म्हणजे अॉनलाईन असो वा स्थानिक , कार्यपद्धती ज्या त्या प्रकाराची वेगळी असते. *नक्कीच खरेदी कुठे करायची हा ग्राहकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरी निदान गावातील तुलनेने छोटया व्यावसायिकाचे गणित समजून घेऊन त्याची तुलना अॉनलाईन मोठ्या व्यावसायिकाशी करून अवहेलना वा खच्चीकरण तरी करू नये यासाठी हा लेख. शक्यतो गावातील व्यावसायिकाकडेच खरेदी करा हे आवाहन आहेच, पण ज्यांना अॉनलाईनच खरेदी करायची आहे त्यांचा "गावातील व्यावसायिक नफेखोरी करतो" हा गैरसमज दूर करण्याचा हा प्रयत्न. *गावातील व्...